शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल योजनेचा ‘निवारा’ लाभार्थींना आवडेना!

By admin | Updated: March 15, 2017 00:08 IST

महापालिका : १५०० पैकी १२०० घरकुले रिक्तच, अनास्था कायम

धुळे : शहरात महापालिकेकडून झोपडपट्ट्यांचे निर्मूलन करून घरकूल योजना राबविण्यात येत आहेत़ मात्र सुमारे १५०० घरकुलांचे बांधकाम झालेले असतांना तब्बल १२०० घरे रिक्तच आहेत़ त्यामुळे घरकूल योजनांचा निवारा लाभार्थींना आवडत नसल्याचे दिसून येत आहे़ मनपाकडून लाभार्थ्यांना सातत्याने सूचित करून घरकुलांचा ताबा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत शहरात घरकूल योजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत़ या योजनेंतर्गत एकूण प्रस्तावित २ हजार १६६ घरकुलांपैकी १ हजार ५०६ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे़ मोहाडी येथे सर्वाधिक ९६६ घरकुले उभारण्यात आली आहेत़ तर उर्वरित घरकुलांची कामे शहरातील विविध भागात सुरू आहेत़ काही ठिकाणी घरकूल योजनांचे काम पूर्णत्वास देखील आले आहे़ तरी लाभार्र्थींना या घरकुलांचा निवारा न आवडल्याने त्यापैकी १ हजार १७० घरकुले रिक्त पडून आहेत़ सातत्याने वादविवादघरकूल योजनेंतर्गत प्रस्तावित घरकुलांमुळे मोहाडी तसेच जुने धुळे परिसरात अनेकदा वादविवाद झाले आहेत़ त्याचप्रमाणे या घरकुलांमध्ये बोगस लाभार्थींचा समावेश करण्यात आल्याने चौकशीही झाली आहे़ जुने धुळयात लाभार्र्थींमध्ये असलेल्या गटबाजीमुळे मनपात दोनवेळा बिºहाड आंदोलने झाली आहेत़लाभार्र्थींना नोटिसामहापालिकेतर्फे घरकूल योजनेत बांधण्यात येत असलेल्या घरकुलांचे कमी क्षेत्रफळ व अपार्टंमेंट स्वरूपात असल्याने लाभार्थी त्यास विरोध करतात़ अपार्टमेंटच्या घरांमुळे जीवनशैली बदलण्याची वेळ येत असल्याचे लाभार्थींचे म्हणणे असल्याने घरकूल योजनेला पहिल्यापासून हवा तसा प्रतिसाद लाभलेला नाही़ मात्र मनपा प्रशासनाने आतापर्यंत सातत्याने लाभार्थ्यांना नोटिसा देऊन आवश्यक ११ हजार रुपये भरून व करारनामा करून घरकुले ताब्यात घेण्याबाबत सूचित केले आहे, मात्र प्रतिसाद मिळालेला नाही़आवास योजनेचे अर्ज पडूनच़़़एकीकडे मोहाडीमध्ये ९६६, राजीव गांधी (यशवंत)नगर ५४०, जुनी भिलाटी १४४, नवीन भिलाटी २१६, अण्णाभाऊ साठे नगर १८० व ताशा गल्लीत १२० अशी २ हजार १६६ घरकुले प्रस्तावित असताना दुसरीकडे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांच्या विविध घटकांसाठी अर्ज मागविण्यात आले होते़ या योजनेंतर्गत तब्बल ६ हजार ५०० पेक्षा अधिक अर्ज दाखल झाले असले तरी या घरकुलांची छाननी अजूनही झालेली नाही़ घरकूल योजनांना प्रतिसाद मिळत नसल्याने मनपाचे अधिकारी अर्जांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते़