रोहयो मजुरीबद्दल गंभीर स्वरुपाची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST2021-04-16T04:36:16+5:302021-04-16T04:36:16+5:30

धुळे : रोजगार हमी योजने अंतर्गत घरकुल योजनेत काम करणाऱ्या मजुरांची मजुरी गहाळ होत असल्याची गंभीर तक्रार वंचित बहुजन ...

Serious complaint about Rohyo wages | रोहयो मजुरीबद्दल गंभीर स्वरुपाची तक्रार

रोहयो मजुरीबद्दल गंभीर स्वरुपाची तक्रार

धुळे : रोजगार हमी योजने अंतर्गत घरकुल योजनेत काम करणाऱ्या मजुरांची मजुरी गहाळ होत असल्याची गंभीर तक्रार वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

धुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील गावांमध्ये घरकुल योजनेतून बेघरांना घरे दिली जातात. राेजगार हमी योजनेच्या माध्यमातून अकुशलची मजुरी आणि कुशलसाठी अनुदान दिले जाते. मजुरांच्या बॅंक खात्यामध्ये मजुरी ऑनलाईन जमा केली जाते. परंतु सदरची मजुरी मजुरांच्या खात्यावर जमा होत नसल्याचे निदर्शनाला आले आहे. यासंदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारींना विचारणा केली असता मजुरांच्या खात्यावर मजुरी जमा केल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र खात्यावर मजुरी जमा झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चाैकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. चक्षुपाल बोरसे आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Serious complaint about Rohyo wages