विज्ञानामुळे मानवी जीवन सुकर झाले आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST2021-05-14T04:35:31+5:302021-05-14T04:35:31+5:30

साक्री येथील सी.गो. पाटील महाविद्यालयात विज्ञान मंडळाच्या ऑनलाइन उद्घाटन प्रसंगी ‘ऊर्जा विनयेन शोभते’ या विषयावर ते प्रमुख व्याख्याते व ...

Science has made human life easier | विज्ञानामुळे मानवी जीवन सुकर झाले आहे

विज्ञानामुळे मानवी जीवन सुकर झाले आहे

साक्री येथील सी.गो. पाटील महाविद्यालयात विज्ञान मंडळाच्या ऑनलाइन उद्घाटन प्रसंगी ‘ऊर्जा विनयेन शोभते’ या विषयावर ते प्रमुख व्याख्याते व उद्घाटक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे होते. उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. सचिन नांद्रे आदी उपस्थित होते.

ऊर्जा व त्याचे महत्त्व स्पष्ट करताना प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा त्याचबरोबर विद्यार्थी विज्ञानाधिष्ठित व्हावा यासाठी प्रयत्नरत राहणे गरजेचे आहे. ऊर्जा व त्याचे मानवी जीवनातील महत्त्व, त्याचबरोबर ऊर्जेची निर्मिती इत्यादींविषयी त्यांनी माहिती दिली. विज्ञानाने जगात बदल झाल्याचेही त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी ऊर्जाविषयीची साक्षरता सर्वश्रुत होऊन ऊर्जेचे संवर्धन करणे काळाची गरज असून, सदर कार्यक्रमातून या अभिनव उपक्रमाला चालना देणे स्तुत्य असल्याचे प्रतिपादित केले.

कार्यक्रमाचे संचालन विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रा. एस.डी. पालखे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. विलास पावरा यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे आय.क्यू ए.सी. समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण व विज्ञान मंडळ समितीचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला विज्ञान विषयाचे अभ्यासक, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Science has made human life easier