मनपा क्षेत्रातील शाळा १४ पर्यंत बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:33 IST2021-03-08T04:33:25+5:302021-03-08T04:33:25+5:30

महापालिका क्षेत्रातील २११ शाळा ७ मार्चपर्यंत बंद महापालिकेच्या ९वी ते १२वीच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये १४ डिसेंबर २० व पाचवी ...

Schools in Municipal Corporation area closed till 14 | मनपा क्षेत्रातील शाळा १४ पर्यंत बंदच

मनपा क्षेत्रातील शाळा १४ पर्यंत बंदच

महापालिका क्षेत्रातील २११ शाळा ७ मार्चपर्यंत बंद

महापालिकेच्या ९वी ते १२वीच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये १४ डिसेंबर २० व पाचवी ते आठवीच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा २७ जानेवारी २०२१पासून ५० टक्के उपस्थितीनुसार सुरू झाल्या होत्या. मनपा क्षेत्रात एकूण २११शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत.

मात्र शहरातील काही शाळांमधील शिक्षकांना कोराेनाची लागण झाल्याने, मुख्याध्यापकांची तातडीची बैठक घेण्यात आली. त्यात ज्या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी कोरोना पॅाझिटिव्ह आले असतील त्या शाळांमधील इयत्ता पाचवी ते १२वीपर्यंतचे सर्व वर्ग तसेच ज्या शाळांमध्ये कर्मचारी विद्यार्थी पॅाझिटिव्ह आढळले नसतील त्या शाळांमध्ये दहावी व बारावीचे वर्ग वगळून पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून २६ फेब्रुवारीपासून ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र शहरात कोरोनाचा कहर कमी होण्याचे प्रमाण दिसत नाही. उलट गेल्या आठवड्यात काही शाळांमधील दहावीला शिकविणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे शाळा बंदच्या निर्णयात अजून वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता मनपा क्षेत्रातील शाळा १४ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत, असे सोनवणे यांनी सांगितले.

Web Title: Schools in Municipal Corporation area closed till 14