ऑनलाइन नोंदणीमुळे १८ ते ४४ वयोगटातील ग्रामीण नागरिक लसीकरणापासून वंचित : तालुक्यातील ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्त्यांचे सीईओंना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:38 AM2021-05-08T04:38:07+5:302021-05-08T04:38:07+5:30

धुळे : धुळे तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी असल्यामुळे ...

Rural citizens in the age group of 18 to 44 are deprived of vaccination due to online registration: Social workers in rural areas of the taluka submit a statement to the CEO | ऑनलाइन नोंदणीमुळे १८ ते ४४ वयोगटातील ग्रामीण नागरिक लसीकरणापासून वंचित : तालुक्यातील ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्त्यांचे सीईओंना निवेदन

ऑनलाइन नोंदणीमुळे १८ ते ४४ वयोगटातील ग्रामीण नागरिक लसीकरणापासून वंचित : तालुक्यातील ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्त्यांचे सीईओंना निवेदन

Next

धुळे : धुळे तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी असल्यामुळे धुळे ग्रामीणमधील १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थी वंचित राहत असून, या वयोगटातील तरुणांमध्ये व नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. इतर तालुके व शहरासह जिल्ह्यातीलही नागरिक नोंदणी करून ग्रामीण भागात लसीकरण करून घेत आहेत. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील ग्रामीण भागातीलच नागरिकांना त्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी धुळे तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

धुळे तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांना निवेदन देऊन १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत मागणी केली. या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १८ ते ४४ वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधक लस नोंदणी ऑनलाइन सुरू झाली आहे. ऑनलाइन नोंदणीमुळे कोणीही कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही लस केंद्रावर नोंदणी करून लस घेत आहे. याचे प्रमाण धुळे तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर जास्त असून त्यामुळे ग्रामीण भागातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. परिणामी, त्यांच्यामध्ये अन्यायाची भावना निर्माण होत असून भविष्यात याचा उद्रेकही होऊ शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर फक्त ग्रामीण भागातीलच नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, पं.स.चे गटनेते पंढरीनाथ पाटील, रितेश पाटील, विशाल सैंदाणे, अशोक सुडके, बापू खैरनार, रावसाहेब पाटील आदी सामाजिक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Web Title: Rural citizens in the age group of 18 to 44 are deprived of vaccination due to online registration: Social workers in rural areas of the taluka submit a statement to the CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.