शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

रोहिणी केटीवेअर कामास मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 12:14 IST

दशकापासून काम रखडले : निधीअभावी काम लालफितीत; पावसाळ्यापूर्व काम झाल्यास मिळेल दिलासा

निजामपूर : ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’च्या भरपूर घोषणा होतात. मात्र पाणी अडवण्याच्या योजनांसाठी निधीच्या अभावाचे कारण पुढे येणे अपेक्षित नसून आगामी पावसाळ्यापूर्वी तरी निजामपूर जैताणेच्या जलसिंचनास वरदान ठरेल असा व अनेक वर्षापूर्वी रोहिणी नदीच्या पुला खाली मंजूर झालेला केटी वेअर त्वरित बांधला जाणे अत्यंत आवश्यक झाले आहे. मात्र लालफितीत अडकलेला हा केटी वेअर बंधारा कधी बाहेर येणार? असा संतप्त सवाल जनतेतून होत आहे.निजामपूर जैताणे येथे २००९ मध्ये रोहिणी नदीच्या पात्रात केटीवेअर बांधण्या संदर्भात सर्वेक्षण झाले होते. त्यावेळी जि.प. सदस्य चंदूलाल जाधव होते. साक्री तालुक्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा झाली. त्यात जाधब यांनी आग्रही भूमिका मांडली होती.या केटीवेअर बांधण्यासाठी एक कोटीचा निधी आवश्यक होता. मात्र निधीअभावी केटीवेअरचे काम लाल फितीत अडकले आणि त्या नंतर वारंवार वृत्तपत्रातून आवाज उठला.पण त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. २०१८ च्या पावसाळ्यात केवळ एक दिवस व अर्धा तास जेमतेम पाऊस झाला आहे. या भागात भीषण दुष्काळ पडला आहे. नदीच्या उगमाकडे थोडा पाऊस झाला, त्यामुळे रोहिणी नदीस पाणी आले ते देखील वाहून गेले.निजामपूर - जैताणे गावाला वळसा देत जाणाच्या रोहिणी नदीपात्रात पुलाखाली पूर्वेस केटीवेअरला जुलै २००९ मध्ये हिरवा कंदील मिळाला होता. तालुक्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा झाली. त्यात या प्रकल्पासाठी आग्रही भूमिका राहिली. ११० मीटर लांब व सात मीटर उंचीचा हा कोल्हापूर टाईप बंधारा बांधायचे नियोजन होते. परिसरातील शेतीला जलसिंचनाचा लाभ होण्याचे व विहिरी, बोअरवेल यांना नवसंजीवनी मिळून दोन किलोमीटर पर्यंतचा परिसर सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ठ्य होते. तब्बल एक दशक उलटले पण केटीवेअर केवळ स्वप्नच राहिला आहे. पं.स. सदस्य वासुदेव बदामे यांनी देखील वारंवार पाठपुरावा केला पण निधीची अडसर पुढे आली. आता येथे भीषण पाणी टंचाई आहे. आगामी पावसाळ्या पूर्वी तरी हे ‘पाणी आडवा पाणी जिरवा’चे काम झाले तर पुढील वर्षी गुरे, मेंढ्या, बकऱ्यांना आणि जनतेस दिलासा मिळू शकेल. रोहिणी नदीतून पावसाळ्यात पाणी वाहून जाते. ते अडवले गेले तर पाणी साठा होऊ शकतो.

टॅग्स :Dhuleधुळे