सेवानिवृत्ती म्हणजे नवीन आयुष्याला सुरुवात - डॉ. तुषार रंधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 10:07 PM2021-03-05T22:07:19+5:302021-03-05T22:07:41+5:30

उपशिक्षिका आशा वाघ यांचा सेवापुर्ती सोहळ्यात प्रतिपादन

Retirement is the beginning of a new life - Dr. Tushar Randhe | सेवानिवृत्ती म्हणजे नवीन आयुष्याला सुरुवात - डॉ. तुषार रंधे

सेवानिवृत्ती म्हणजे नवीन आयुष्याला सुरुवात - डॉ. तुषार रंधे

googlenewsNext

शिरपूर : शाळेत येणारा विद्यार्थी हा मातीच्या गोळ्याप्रमाणे असतो. शिक्षक त्याला शिकवतात, संस्कार देतात़ समाज, कुटुंब, देशासाठी चांगला नागरिक घडवतात. म्हणून शिक्षकांचे कार्य मातीच्या गोळ्याला सुबक आकार देणाऱ्या कुंभाराप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्वपूर्ण आहे. म्हणून शिक्षक कधीही रिटायर्ड होत नाही. तर ते रिफ्रेश होऊन शेवटपर्यंत मार्गदर्शकाची भुमिका निभावतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी केले.
शिरपूर येथील सौ.सावित्रीताई रंधे कन्या विद्यालय व श्रीमती के. एस. बर्वे उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका आशा वाघ यांचा सेवापुर्ती व सत्कार कार्यक्रम झाला. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. तुषार रंधे हे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे सचिव निशांत रंधे, खजिनदार लिला रंधे, भाजपा तालुका अध्यक्ष राहुल रंधे, विश्वस्त व नगरसेवक रोहित रंधे, ग.स. बँक संचालक शशांक रंधे, श्यामकांत वाघ, माजी जि.प.सदस्या सिमा रंधे, सारीका रंधे, के. डी.बच्छाव, भैय्या माळी, सिताराम माळी, रविंद्र वाघ, प्रा. कल्पेश वाघ, सागर वाघ, प्राचार्या मंगलापावरा, उपमुख्याध्यापक जे.के. सोनवणे, पर्यवेक्षिका जे.एल. पाटील उपस्थित होते.
उपशिक्षिका आशा वाघ यांनी सत्काराला उत्तर दिले़ त्या म्हणाल्या, शिक्षकाचे काम अतिशय जबाबदारीचे असते. मुलींच्या शाळेत नोकरी करताना विद्याथीर्नींना आईच्या भूमिकेतुन चांगले संस्कार दिले. आज जरी मी सेवानिवृत्त होत असली तरी माझ्यातील शिक्षिका सेवानिवृत्त होणार नाही व यापुढे देखील शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना आणण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन स्मिता कोठारी यांनी केले.

Web Title: Retirement is the beginning of a new life - Dr. Tushar Randhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे