शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसाच्या खरेदीसाठी तौबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:37 IST

धुळे : जिल्ह्यात शासन निर्णयानुसार बुधवारी सकाळी ११ वाजेनंतर कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र त्याआधी सकाळी ७ वाजेपासून ...

धुळे : जिल्ह्यात शासन निर्णयानुसार बुधवारी सकाळी ११ वाजेनंतर कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र त्याआधी सकाळी ७ वाजेपासून ११ वाजेदरम्यान एक दिवसाच्या भाजीपाला आणि किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी तौबा गर्दी केली होती. बाजारपेठेत आग्रारोड, पाचकंदील परिसरात नागरिकांची एकच गर्दी झाली होती. मात्र ११ वाजेनंतर पोलिसांनी बाजारपेठेचा ताबा घेतल्यानंतर दुपारी १२ वाजेनंतर सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

बुधवारी सकाळी ७ वाजेनंतर बाजारपेठ खुली झाल्यावर एका दिवसाची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी तौबा गर्दी केल्याचे दिसून आले. दररोज सकाळी ७ ते ११ बाजारपेठ सुरू राहणार असल्याचे जाहीर केलेले असताना पहिल्याच दिवशी जसे महिन्याभराची खरेदी करावयाची आहे. अशापद्धतीने नागरिकांनी सकाळी बाजारपेठेत गर्दी केली. गर्दीत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. गर्दीत अनेकांनी पोलीस पकडतील म्हणून फक्त तोंडाला रुमाल बांधलेले दिसून आहे.

कडक पोलीस बंदोबस्त

शहरात सकाळी ७ वाजेपासूनच शहरातील सर्वच प्रमुख चौकामध्ये कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. अनेक ठिकाणी वाहतूक अडविण्यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आलेले होते. तसेच लोकांना अडवून काय काम आहे याची विचारणा केली जात होती.

दुपारी १२नंतर शुकशुकाट

- ११ वाजेनंतर लाॅकडाऊन सुरू झाल्याचे सांगत पोलिसांनी बाजारपेठेतील भाजीपाला हाॅकर्स आणि लोकांना घरी जाण्याचे सांगत होते. त्यामुळे दुपारी १२ वाजेनंतर मुख्य बाजारपेठेसह सर्वच ठिकाणी शुकशुकाट दिसून आला. रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस रस्त्यावरून फिरणाऱ्या लोकांना अडवून विचारपूस सुरू केली. तसेच विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना लाठीचा प्रसादही मिळाला.

दारूसाठी धावपळ

लाॅकडाऊनमध्ये वाॅइन शाॅपी बंद ठेवण्याचे आदेश आहे, जर कोणाला पाहिजे असेल तर घरपोच दारू पोहचविण्याची मात्र मुभा आहे. पण बुधवारी साक्री रोडवर आणि शहर पोलीस स्टेशनसमोरील वाॅइन शाॅप छुप्यापद्धतीने सुरू होती आणि त्याठिकाणी मद्यशौकिनांनी खरेदीसाठी गर्दी केलेली दिसून आली. हे पोलिसांच्या लक्षात आल्यावर पोलिसांनी ती दुकाने बंद करावयास लावली. यावेळी त्याठिकाणी दारू खरेदी करण्यासाठी आलेल्या शौकिनांना तेथून पळ काढावा लागला.

औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरू

- अवधान औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरळीत सुरू होते.

अत्यावश्यक सेवा सुरू - शहरातील औषधांची दुकाने मात्र दिवसभर सुरू होती.