शिरपूर येथे लसीकरणासाठी नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:34 AM2021-04-12T04:34:05+5:302021-04-12T04:34:05+5:30

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध असूनही त्याबाबत अफवांना पेव फुटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रम ...

Registration for vaccination at Shirpur | शिरपूर येथे लसीकरणासाठी नोंदणी

शिरपूर येथे लसीकरणासाठी नोंदणी

Next

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध असूनही त्याबाबत अफवांना पेव फुटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रम आहे. लस घेण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करणे आवश्यक असून अनेकांना त्याबाबत अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये कोरोना लसीकरणासाठी नावनोंदणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

आ.अमरीशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रभागाचे नगरसेवक मोहन हुलेसिंग पाटील, नगरसेविका मोनिका रोहित शेटे यांनी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून प्रभागातच लसीकरणासाठी नावनोंदणी केंद्राची निमिती केली. शासनाने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस उपलब्ध केली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन नावनोंदणी करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्या अनुषंगाने पाटीलवाडा येथील श्री मारूती मंदिरासमोरच लस घेण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी नावनोंदणी केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रावर प्रभागातील व शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडून नावनोंदणीला प्रतिसाद मिळत आहे. ज्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे, त्यांना प्रमाणपत्र देण्याची सोय उपलब्ध करण्यात आली असून अनेकांना वाटपही करण्यात आले आहे.

प्रभागातील व शहरातील ज्या नागरिकांना लस घ्यावयाची असेल, त्यांनी केंद्रावर नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजक नगरसेवक मोहन पाटील, नगरसेविका मोनिका शेटे यांनी केले आहे. तसेच शहरासाठी इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे व शहराजवळील कळमसरे, वाघाडी, करवंद या उपकेंद्रावर लसीकरणाची सोय उपलब्ध करावी, अशी मागणी भाजप शहर सरचिटणीस रोहित शेटे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: Registration for vaccination at Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.