शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

विषमुक्त शेती केल्यास खर्चात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:22 IST

शेतीतज्ञ डॉ.जी.एस. गिल : शिरपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन

शिरपूर : येथे पाणी भरपूर आहे, मात्र शेती नियोजनाचा अभाव व रासायनिक खतांचा वापर अधिक असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही़ त्यासाठी स्वयंपाकावेळी फेकून देण्यात येणारे पाणी व शेणखताचा वापर केल्यास निश्चितच खर्च कमी होवून विषमुक्त शेती करता येईल, असे प्रतिपादन पंजाब येथील शेतीतज्ञ डॉ़जी़एस़ गिल यांनी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. त्यांनी शिरपूर पॅटर्नबद्दलही गौरवोदगार काढले.बुधवारी १३ रोजी येथील पटेल आॅडिटोरीयम हॉलमध्ये उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्यात ‘विषमुक्त शेती’ विषयावरील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन, शिसाका व्हाईस चेअरमन दिलीप पटेल, के़डी़पाटील, भूमाता ब्रिगेडच्या मनिषा निकम-टिळेकर, माधुरी गुजराथी, डॉ़आऱएल़जैन, राजेश मारवाडी, राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते़डॉ.गिल हे विषमुक्त शेती व विषमुक्त अन्न ही संकल्पना हाती घेवून काम करीत आहे़ शेतकऱ्यांचा लागवड खर्च ५० टक्के कमी करून उत्पादन २० ते २२ टक्के वाढविणे, जमीन सुपिक कशी राहील, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले़ तसेच कच्चे शेणखत शेतात न टाकता त्यावर प्रक्रिया करावी. त्यामुळे असा प्रयोग केल्यास प्रत्येक शेतकरी घरच्या घरी शेणखताचा कारखाना तयार करू शकतात़ शेतीत नवनवीन उपक्रम राबवून शेतकºयांनी स्वत: त्याविषयी संशोधन करून डॉक्टर व्हावे़ तयार केलेले उत्पन्न स्वत:च विकले पाहिजे, व्यापाºयांना त्या मालाचा भाव करण्याची संधी देवू नका़ जेणेकरून शेतकºयांना अधिक लाभ मिळू शकतो़, असे डॉ.गिल यांनी स्पष्ट करून सांगितले.शेतात विभिन्नता आणा, वेगवेगळे पीक घ्या, मातीची प्रत टिकवा, शक्यतोवर कॅश क्रॉपकडे अधिक लक्ष द्या़ रासायनिक खतांचा अधिक मात्रा मारल्यामुळे शेती खराब होत असल्याचे सांगून कमी खर्चात चांगले पीक व उत्पन्न देखील चांगले येईल, असेही डॉ.गिल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन एस़व्हीक़े.एम़, एऩएम़आय़एम़ एस़ संचलित सावळदे येथील स्कूल आॅफ अ‍ॅग्रिकल्चर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी व भूमाता ब्रिगेड शाखा शिरपूरच्यावतीने हा शेतकरी मेळावा घेण्यात आला़ सुत्रसंचालन राजेश मारवाडी यांनी केले़

टॅग्स :Dhuleधुळे