शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रात्री चौकात होणारी गर्दी कमी करा; रस्त्यावर क्रिकेट खेळणे बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:37 IST

धुळे : लाॅकडाऊनदरम्यान शहरात रात्री चौकामध्ये होणारी गर्दी कमी करा तसेच दुपारी आणि सायंकाळी रस्त्यावर काॅलनीच्या मैदानावर क्रिकेट खेळणेही ...

धुळे : लाॅकडाऊनदरम्यान शहरात रात्री चौकामध्ये होणारी गर्दी कमी करा तसेच दुपारी आणि सायंकाळी रस्त्यावर काॅलनीच्या मैदानावर क्रिकेट खेळणेही बंद करा तसे केले नाहीतर पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांनी बुधवारी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत दिला.

लाॅकडाऊन आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहर पोलीस स्टेशनजवळील एका हाॅटेलमध्ये शांतता कमिटीची बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे, देवपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, शहर पोलीस स्टेशनचे नितीन देशमुख, आझादनगर पोलीस स्टेशनचे आनंद कोकरे यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

मुस्लिमबांधवांनी कोविडसंदर्भात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत रमजान ईद हा सण साजरा करावा, असे आवाहन यावेळी पोलिसांनी केली.

रात्री चौकात होणारी गर्दी टाळा. लाॅकडाऊनकाळात सर्व बंद असल्याने रस्त्यावर आणि काॅलनी परिसरात नागरिक क्रिकेट खेळतात. ते चुकीचे आहे. ते बंद करण्यात यावे, तसे केले नाही तर मग पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल. शहरात विनाकारण बाहेर पडू नका, मोठ्या संख्येने गर्दी करू नका, कोरोना महामारीपासून आपण व आपल्या परिवाराचा बचाव करा. मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचनाही यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांनी केल्या.

यावेळी कमिटीच्या सदस्यांनीही सहकार्य करण्याचे आश्वासन पोलीसांना दिले.