रुग्णसंख्येचा विक्रम, तब्बल ६०० जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST2021-04-16T04:36:54+5:302021-04-16T04:36:54+5:30

जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येने ३२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण बाधित रुग्णांची संख्या ३२ हजार २८० इतकी झाली ...

Record number of patients, as many as 600 affected | रुग्णसंख्येचा विक्रम, तब्बल ६०० जण बाधित

रुग्णसंख्येचा विक्रम, तब्बल ६०० जण बाधित

जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येने ३२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण बाधित रुग्णांची संख्या ३२ हजार २८० इतकी झाली आहे. त्यापैकी २७ हजार ५८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात साक्री येथील वृद्ध महिलेसह एक महिला, शिरपूर येथील पुरुष, दोंडाईचा येथील पुरुष, देवपुरातील पुरुष, शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील एका पुरुषाचा समावेश आहे. तसेच एसीपीएम मेडिकल काॅलेजमध्ये दोन पुरुषांचा मृत्यू झाला. त्यात धुळे शहरासह धुळे तालुक्यातील शिरडाणे येथील एकाचा समावेश आहे. असे एकूण आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील ४९४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात, धुळे शहरातील २०६, तर ग्रामीण भागातील २८८ रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारच्या अहवालानुसार, ६०० अहवाल पॉझिटिव्ह आले. रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Record number of patients, as many as 600 affected