चोरीच्या १० मोटारसायकली हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 10:51 PM2020-02-19T22:51:46+5:302020-02-19T22:52:11+5:30

स्थानिक गुन्हे शाखा : सोनगीर पोलिसांची संयुक्त कारवाई, बोरीस गावातील चोराला पकडण्यात यश

Receiving 3 stolen motorcycles | चोरीच्या १० मोटारसायकली हस्तगत

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच सोनगीर पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत़ त्याच्याकडून चोरीच्या दहा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत़ तसेच आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे़
गेल्या वर्षी सोनगीर पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता़ या गुन्ह्यातील मोटारसायकल धुळे तालुक्यातील बोरीस येथे गणेश जिभाऊ भिल याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने चोरली असल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी मिळाली़ त्यानुसार सोनगीर पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने संशयिताचा शोध घेवून त्याला ताब्यात घेतले़ पोलिसांनी त्याला विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली़ तसेच चोरीच्या दहा मोटारसायकली देखील मिळवून दिल्या़ या मोटारसायकलींची अंदोज किंमती दोन लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले़ तसेच या मोटारसायकली चोरीचे गुन्हे धुळे, नंदुरबार, नाशिक, बीड, पुणे येथे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली़
पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ, पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे, सोनगीर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलिस उप निरीक्षक अनिल पाटील, हनुमंत उगले, राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलिस उप निरीक्षक नथा भामरे, हवालदार सुनील विंचुरकर, संजय पाटील, संदिप थोरात, रफिक पठाण, महेंद्र कापुरे, वसंत पाटील, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, मायुस सोनवणे, कुणाल पानपाटील, मनोज पाटील, तुषार पारधी, चेतन कंखरे, योगेश जगताप, किशोर पाटील, विजय सोनवणे, विलास पाटील, गुलाब पाटील, केतन पाटील, दिपक पाटील, सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, अतुल निकम यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली़
हस्तगत केलेल्या १० मोटारसायकलींचे इंजिन आणि चेचीस नंबर पोलिसांना मिळाले आहेत़ तसेच पाच मोटारसायकलींचे पासिंग नंबर मिळाले आहेत तर इतर पाच गाड्यांना नंबर प्लेट नाही़ पासिंग क्रमांक असे: एममएच १८ क्यु २४०२, एमएच १८ एआय २६३८, एमएच ३९ एबी ३०३२, एमएच १४ सीआर ५०९९, एमएच १८ बीपी ८३०५़
ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी सुरु असून त्याच्याकडून धुळे, नंदूरबारसह राज्यातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़
दरम्यान, नरडाण्यातून एकाच रात्री तीन तर दहिवेल गावातून शिक्षकाची मोटारसायकल चोरीला गेली आहे़ या गुन्ह्यांचा तपास देखील लवकरच लावू असे पोलिसांनी सांगितले़
हस्तगत केलेल्या १० मोटारसायकलींचे इंजिन आणि चेचीस नंबर पोलिसांना मिळाले आहेत़ तसेच पाच मोटारसायकलींचे पासिंग नंबर मिळाले आहेत तर इतर पाच गाड्यांना नंबर प्लेट नाही़ पासिंग क्रमांक असे: एममएच १८ क्यु २४०२, एमएच १८ एआय २६३८, एमएच ३९ एबी ३०३२, एमएच १४ सीआर ५०९९, एमएच १८ बीपी ८३०५़

Web Title: Receiving 3 stolen motorcycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे