राजेश पवार यांची सभागृहनेतेपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:35 IST2021-03-19T04:35:17+5:302021-03-19T04:35:17+5:30

महापालिकेचे सभागृह नेते कांतीलाल माणिक दाळवाले यांनी सभागृह नेते पदाचा राजीनामा दिला आहे. परिणामी सभागृह नेते पद रिक्त होते. ...

Rajesh Pawar elected as Leader of the House | राजेश पवार यांची सभागृहनेतेपदी निवड

राजेश पवार यांची सभागृहनेतेपदी निवड

महापालिकेचे सभागृह नेते कांतीलाल माणिक दाळवाले यांनी सभागृह नेते पदाचा राजीनामा दिला आहे. परिणामी सभागृह नेते पद रिक्त होते. या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्या वालीबेन प्रकाशचंद्र मंडोरे यांचे १३ मार्च २०२१ चे पत्रानुसार तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १९ एक अ (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये महापौर चंद्रकांत सोनार यांनी महापालिकेच्या सभागृह नेतेपदाचा मान हा भाजपचे नगरसेवक राजेश ईश्वर पवार यांना दिला. तसे पत्रदेखील पवार यांना महापौर सोनार यांनी दिले.

महापौर चंद्रकांत सोनार यांच्या दालनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती संजय जाधव, नगरसेवक युवराज पाटील, भगवान देवरे, दगडू बागुल, नागसेन बोरसे, रानमळ्याचे सरपंच प्रवीण पवार, भाजपचे मंडळ अध्यक्ष प्रवीण अग्रवाल, विठ्ठल गावडे, सतीश गावडे, आप्पा गावडे, राकेश पवार, पप्पू डापसे, जयेश मगर आदी उपस्थित होते.

Web Title: Rajesh Pawar elected as Leader of the House