शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
5
ना बाजारात विकत, ना जेवणात वापरत, भारतीत एकमेव शहर, येथे  कांदा, लसुणीच्या वापरावर आहे पूर्ण बंदी
6
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
7
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
8
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
9
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
10
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
11
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
12
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
13
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
14
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
15
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
16
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
17
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
18
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
19
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
20
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कालवा दुरुस्तीने रब्बीला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 13:17 IST

अमरावती प्रकल्प : २ हजार ६०६ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या दुरुस्ती व साफसफाई काम झाल्यामुळे याचा रब्बी हंगामातील बागायती क्षेत्र तसेच आगामी खरीप हंगामाच्या कापूस लागवडीसाठी चांगला फायदा होणार आहे.यामुळे दोन हजार ६०६ हेक्टर जमिनीला तसेच कालव्याला लागून असलेल्या विहिरींना देखील याचा लाभ होणार आहे.मालपुरसह सुराय, चुडाणे, दोंडाईचा तसेच अप्रत्यक्षपणे खर्दे, मांडळ, विखरण या गावांचा देखील आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच बागायती क्षेत्रात वाढ होईल. यासाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला गेल्याचे फलित असल्याने मालपूर, सुराय, विखरण येथील ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. उजवा कालवा १४ कि.मी. तर डावा कालवा सहा कि.मी. लांबीचा आहे. अनेक वर्षांपासून हे कालवे बंद असल्यामुळे गाळ तसेच काटेरी झुडपांमुळे हे कालवे पुर्णपणे नादुरुस्त होते. यामुळे धरणातील पाणी शेती तसेच शेत बांधापर्यंत पोहचत नव्हते. तसेच परिणामी विहिरीची देखील पाणी पातळी खालावत होती. यामुळे विहिरींना पाणी कायमस्वरूपी टिकून रहाणार आहे. पाटचाऱ्या तसेच कालव्याची दुरुस्तीची मागणी शेतकऱ्यांनी ‘लोकमत’मधून केली होती. त्यानुसार दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्णत्वास आले. तसेच कलवाडे फाटा जवळ कालवा खोलीकरण करवा यामुळे धरण बांधाजवळील पाझर कमी होणार आहे व तेथील शेतकºयांची शेती नुकसान देखील वाचणार आहे. ही मागणी मात्र शेतकºयांची कायम आहे. याकडे देखील लक्ष केंद्र्रित करावे, अशी मागणी केली आहे. सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे यासाठी काम केले. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे तरच यापाण्याचा फायदा यासाठी शेतकºयांनी पाणी मागणी अर्ज भरून सहकार्य करावे असे येथील प्रकल्प अभियंता प्रशांत खैरनार यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे