आर. डी. एम. पी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:33 IST2021-04-12T04:33:47+5:302021-04-12T04:33:47+5:30

शासनाचे बेटी बचाओ - बेटी पढाओ धोरण आहे. यात मुलींची संख्या वाढतानाच त्यांनी शिक्षणात पण भरारी घ्यावी हा उद्देश ...

R. D. M. P. Prizes to junior college students | आर. डी. एम. पी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना पारितोषिक

आर. डी. एम. पी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना पारितोषिक

शासनाचे बेटी बचाओ - बेटी पढाओ धोरण आहे. यात मुलींची संख्या वाढतानाच त्यांनी शिक्षणात पण भरारी घ्यावी हा उद्देश आहे. यात शाळेतील विद्यार्थिनींची हजेरी व गुणवत्ता ग्राह्य धरून दहावी व बारावी या परीक्षेत जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन म्हणून रोख पारितोषिक दिले जाते.

आर. डी. एम. पी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावीत विज्ञान शाखेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या

विद्यार्थिनी ग्रीष्मा अशोक गुजराथी, खुशी सुनील अग्रवाल, युतिका देवेंद्र नागरे यांना प्रत्येकी दोन हजार २७२ रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला. हा धनादेश गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उपगट शिक्षणाधिकारी गायकवाड, विस्तार अधिकारी डी. एस. सोनवणे, जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गिरीश बागुल, प्राचार्य डी. एन. जाधव, आदी उपस्थित होते. विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, सचिव सी. एन .राजपूत, शालेय प्रशासन सचिव ललितसिंह गिरासे, विकास अधिकारी आर. टी. गिरासे, आदींनी अभिनंदन केले.

Web Title: R. D. M. P. Prizes to junior college students