शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे हाॅकर्स झोन जागेचा प्रश्न प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 22:24 IST

खाऊगल्लीचे कामही रेंगाळले

धुळे : येथील मुख्य बाजारपेठेत हाॅकर्सची संख्या मोठी आहे. किरकोळ व्यावसायिक पोटापाण्याचा प्रश्न सोडवित असले तरी त्यांच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, हे नाकारता येणार नाही. हाॅकर्सला जागा देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असला तरी हा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. शिवाय खाऊगल्लीचे कामदेखील रखडले आहे.धुळे शहरात आग्रारोड, पाचकंदीलसह इतरही प्रमुख रस्त्यांवर फेरीवाले व्यावसायिक दोन्ही बाजूला उभे राहतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या व्यावसायिकांना स्वतंत्र जागा देण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांची नोंदणी करण्याचे काम करण्यात येत आहे. दुसरीकडे अद्यापही फेरीवाल्यांना स्वतंत्र जागा मिळालेली नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे.शहरात आग्रारोड, पारोळारोडवर तसेच मुख्य चौकात फेरीवाले व्यावसायिक उभे राहतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ते उभे राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. काही वेळा रस्त्यावरून पायी चालणे देखील जिकीरीचे होते. फेरीवाल्यांना जागा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने एक समिती नियुक्त केली होती. तसेच व्यावसायिकांसाठी उभे राहण्यासाठी शहरातील काही जागा निश्चित केल्या होत्या. परंतु, या जागांना विरोध झाला होता. आता मनपाच्या प्रकल्प विभागाकडून फेरीवाला व्यावसायिकांची नोंदणी करण्यात येत आहे. नोंदणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन करण्यात येत आहे. परंतु, अजूनही जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. रस्त्यावर फेरीवाल्यांची संख्या वाढते आहे. देवपूर दत्तमंदिर चौक परिसरात पूर्वी मोकळ्या जागेत भाजीबाजार होता. ही जागा खासगी असल्याने बाजार दत्तमंदिर चौकापासून जीटीपी चौकापर्यंतच्या रस्त्यावर भरतो. रहदारीच्या दृष्टीने मोकळा असलेला हा एकमेव रस्ता देखील पथविक्रेत्यांनी काबीज केला आहे. सायंकाळी तर दुचाकी जाईल इतकीच जागा शिल्लक राहते. भाजीपाला खरेदीसाठी आलेल्यांची गर्दी असते.कारवाई नावालाचशहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महानगरपालिका तसेच पोलिसांच्या वाहतुक शाखेकडून वेळोवेळी हाॅकर्सवर कारवाई होते. परंतु ही कारवाई केवळ नावालाच असते. कारवाई पथक गेले की लगेच हातगाड्या पुन्हा रस्त्यावर येतात. व्यवसायक करुन पोट भरणाऱ्यांचा पोटमारा होवू नये यासाठी हाॅकर्स झोन त्वरीत करण्याची गरज आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे