पालकमंत्र्यांच्या हस्ते इंदिरा गांधी कन्या विद्यालयातील विद्यर्थिनींचा गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:22+5:302021-02-05T08:44:22+5:30

निजामपूर -माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत निजामपूर जैताणे येथील इंदिरा गांधी माध्यमिक कन्या विद्यालयातील नववीतील विद्यार्थिनी ऐश्वर्या अविनाश जाधव ...

Praise of the students of Indira Gandhi Kanya Vidyalaya at the hands of the Guardian Minister | पालकमंत्र्यांच्या हस्ते इंदिरा गांधी कन्या विद्यालयातील विद्यर्थिनींचा गुणगौरव

पालकमंत्र्यांच्या हस्ते इंदिरा गांधी कन्या विद्यालयातील विद्यर्थिनींचा गुणगौरव

निजामपूर -माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत निजामपूर जैताणे येथील इंदिरा गांधी माध्यमिक कन्या विद्यालयातील नववीतील विद्यार्थिनी ऐश्वर्या अविनाश जाधव हिचा जिल्हा स्तरावर चित्रकला स्पर्धेत निवड झाली असून प्रजासत्ताकदिनी धुळे येथे तिला गौरविण्यात आले.

जिल्ह्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांच्या स्तरावर या तीन गटांमध्ये सप्टेंबर २० मध्ये निबंधस्पर्धा,काव्यस्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या तिन्ही गटांमध्ये व तिन्ही उपक्रमांमध्ये जिल्हा स्तरावर प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना धुळे पालकमंत्री अब्दुल नबी सत्तार यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथील क्रीडांगण,देवपूर,येथे त्यांचा गुणगौरव करण्यात आला.

इ ९ वी ते १२ वी गटातील विद्यार्थिनी ऐश्वर्या जाधव ही चित्रकला स्पर्धेत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक आला आहे. तिला बक्षीस व प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री यांनी गौरविले आहे. यावेळी मुख्याध्यापक ए. एस. अहिरराव सोबत होते.

Web Title: Praise of the students of Indira Gandhi Kanya Vidyalaya at the hands of the Guardian Minister