शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानदेवी पाड्यावर पोलीस बंदोबस्तात चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:35 IST

गुऱ्हाळपाणी ग्रामपंचायत अंतर्गत प्रधानदेवी पाड्यावर बुधवारी कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. गावात ग्रामपंचायतमार्फत फवारणी करण्यात आली. तसेच गावातील ...

गुऱ्हाळपाणी ग्रामपंचायत अंतर्गत प्रधानदेवी पाड्यावर बुधवारी कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. गावात ग्रामपंचायतमार्फत फवारणी करण्यात आली. तसेच गावातील सर्व नागरिकांना कोरोना अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्याचे आवाहन करण्यात येऊन गावातच तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

सदर तपासणी शिबिरात वकवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन पवार, एमपीडब्ल्यू पवार, एएनएम बी.एस. पावरा, ग्रामसेवक डी.बी.तिरमले, तलाठी एस.टी. कोकणी, पोलीस पाटील सरकार पावरा, अंगणवाडी सेविका सुडीबाई पावरा, आशा फुगरीबाई पावरा, सांगवी पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.

गटविकास अधिकारी वाय़.डी़ शिंदे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून प्रधानदेवी पाड्यावर जाऊन तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते़ त्याप्रमाणे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रधानदेवी पाड्यावर जाऊन तपासणी केली़ पाड्यावरील एका मयताच्या कुटुंबातील १७ लोकाची ॲन्टिजेन रॅपिड स्टेस्ट केली असता सर्व निगेटिव्ह आढळून आले़ आक्सिमीटर व थर्मल गनने ४५ महिला व ४९ पुरुषांची तपासणी करण्यात आली़ त्यापैकी कोणतीही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली नाही

गेल्या आठवड्यात या पाड्यावर एका वृध्द इसमाचा कोरोना सदृश आजाराने मृत्यू झाला होता़ मात्र आरोग्य पथकाने त्यांच्या घरासह गावातील लोकांची चाचणी केली असता एकही जण पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत़ त्यामुळे त्या वृध्दाचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे सांगण्यात आले़