शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

डीजे वाजविल्यास कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:04 PM

शिवजयंती : शहर पोलिस ठाण्यात बैठक, जयंती पारंपारिक वाद्याने उत्साहात साजरी करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिवजयंती साजरी करताना डीजे वाजविण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने जयंती उत्सव मंडळातील तरुणांचा हिरमोड झाला आहे़ छ़ शिवाजी महाराज यांची जयंती पारंपारिक वाद्याने उत्साहात आणि शांततेत साजरी करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़शिवजयंती जसजशी जवळ येत आहे तसतसा तरुणांचा उत्साह वाढतो आहे़ शहरात चौकाचौकामध्ये शुभेच्छांचे मोठमोठे बॅनर लागले आहेत़ बाजारात भगवे झेंडे दाखल झाले असून काही तरुणांनी आतापासुनच आपल्या मोटारसयकलींना झेंडे लावले आहेत़ त्यामुळे शिवजयंतीचा उत्साह आजाच दिसू लागला आहे़येतय १९ फेब्रुवारीला होणारी छ़ शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात आणि शांततेत पार पडावी, जयंती उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिसांनी जनसंपर्क वाढविण्यास सुरूवात केली आहे़ यात धुळे शहर पोलिस ठाण्याने आघाडी घेतली असून पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी बुधवारी सकाळी शहरातील जयंती उत्सव मंडळांच्या अध्यक्षांची आणि कार्यकर्त्यांची औपचारिक बैठक बोलावली होती़बैठकीला उपस्थित असलेल्या जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डीजेला परवानगी द्यावी अशी एकमुखी मागणी केली़ परंतु डीजे वाजविण्यास बंदी असल्याने परवानगी देवू शकत नाही अशा शब्दात नकार देत पारंपारिक वाद्याच्या सहाय्याने जयंती साजरी करावी, प्रत्येक जयंती उत्सव समितीने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करावी, मद्यपिंवर जातीने लक्ष ठेवावे अशा सूचना केल्या़ जयंती साजरी करणाºया मंडळांनी त्या त्या ठिकाणी आयोजित केलेल्या बैठकीला पोलिस प्रशासन मार्गदर्शन करण्यासाठी आणि तरुणांची समजुत काढण्यासाठी येण्यास तयार असल्याचे पोलिस निरीक्षक पाटील म्हणाले़दरम्यान, पारंपारिक वाद्य अतीशय महागडे आहेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत या प्रमुख अडचणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या़ परंतु यावर त्यांनीच मार्ग काढावा, स्वत:चे पथक तयार करुन सराव करावा, असे मार्गदर्शन पाटील यांनी केले़शिवजयंती मिरणुकीची कुणालाही अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी़ रुग्णवाहिकांना मार्ग द्यावा़ मिरवणुकीतील प्रात्यक्षिकामुळे कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या़शिवजयंती साजरी करताना सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम देखील राबविणे आवश्यक असल्याचे मत पोलिस निरीक्षक पाटील यांनी व्यक्त केले़ दोंडाईचा येथे तरुणांनी शिवजयंतीसाठी जमा केलेल्या निधीतून रुग्णवाहिका सेवा सुरू करुन चांगला आदर्श निर्माण केल्याची आठवण त्यांनी करुन दिली़शिवजयंती मिरवणुकीत डीजे वाजविल्यास मिरवणुकीनंतर संबंधितांवर कायदेशिर कारवाई करुन गुन्हे दाखल केले जातील, असा ईशारा पोलिस निरीक्षक पाटील यांनी दिला़दरम्यान, शिवजयंती उत्सवासाठी विविध मंडळांची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे़ पोलिसांकडे तशी नोंदणी केली जात आहे़

टॅग्स :Dhuleधुळे