शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

बाभळे औद्योगिक वसाहतीत प्लॅस्टीक कंपनीत आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 13:50 IST

तीन दिवसात दुसरी घटना : नागरिकांनी मिळविले आगीवर नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कदत्तवायपूर/नरडाणा : शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतील फेज दोन बाभळे हद्दीतील कंपन्यांमधे आगीचे सत्र सुरूच आहे. बुधवार २६ रोजी प्लास्टीकच्या पाण्याच्या टाक्या बनविणाऱ्या शिव प्लास्ट कंपनीमध्ये दुपारी एक वाजेच्या सुमारास आग लागली. ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थांना कळताच अग्निशामक विभागाला व गावातील कार्यकर्त्यांना कळवून आग विझविण्यास मदत केली.बाभळे फेज दोन येथे तीन दिवसापूर्वी डॉ.एजाज शेख यांच्या मालकीची सेवा सर्जिकल कंपनीला आग लागली होती. तसेच बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिव प्लास्ट कंपनीला (हिमालया टाकी) अचानक लागल्याची महिती बाभळे येथील सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांना मिळाल्याने ग्रामस्थांना सहकार्यासाठी बोलवून घटनास्थळी धाव घेतली. कंपनीत असलेल्या फायर सुरू करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तो पावेतो धुळे येथील दोन अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले होते.आगीत वेस्टेज माल जळून खाक झाला. वेळीच आग विझविल्याने मोठे नुकसान टळले. कंपनीच्या बाजूला कचरा जाळून कर्मचारी जेवणासाठी निघून गेले. त्यामुळे आग वाढली आणि वेस्टेज पडलेल्या प्लॅस्टिकने पेट घेतला. तसेच स्टोअर रुममध्ये असलेल्या पंधरा गॅस सिलिंडर बाजूला केल्याने अनर्थ टळला. मात्र आगीत सात ते आठ लाखाचे नुकसान झाल्याचे कंपनीचे संचालक राजेश वाणी यांनी सांगितले.आग लागल्यानंतर निघणारा धूर बाभळे फाट्यावर दिसत असल्याने शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुशील गांगुर्डे हे रस्त्याने जात असतांना त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. सर्व ग्रामस्थांनी जिव धोक्यात टाकून आग आटोक्यात आणली. यात कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी फायर सुरू करून आग आटोक्यात आणली.आग लागल्यानंतर सरपंच ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच भरत पाटील, हिरालाल पाटील, गोविंदा ठेलारी, मनोहर रूपनर, सुकदेव ठेलारी, विकास पाटील, समाधान पाटील, रोशन आदींनी आग विझविण्यास मदत केली. आगीची माहिती मिळताच शिंदखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत चिमठाणे दुरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे, प्रभाकर सोनवणे, दिपक माळी, राजू पावरा यांनी घटनास्थळी धाव घेतली व झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. यासंदर्भात पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे