शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावण्या, पाण्याचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 12:26 IST

बळसाणे : माळमाथा परिसरात दुष्काळाच्या झळा, बुराई नदीत पाणी सोडण्याची मागणी

बळसाणे : बुराई नदी कोरडी झाली असून नदीकाठावरील माळमाथा परिसरातील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. साक्री तालुक्यासह माळमाथा परिसर हा कायम दुष्काळी भाग म्हणून गणला जातो दर पाच ते सहा वर्षांनी माळमाथ्यासह बळसाणे करांना दुष्काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, गेल्या काही वर्षातील दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ अधिक तीव्र आहे. यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. बुराई प्रकल्पातून तातडीने नदीत पाणी सोडल्यात यावे, अशी मागणी होत आहे.सद्यस्थितीत विश्वकल्याणक येथून पाण्याचे टँकर येत आहे. परंतू पाणी पुरत नसल्याने ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. गावात खासगी मालकीचे बोअर असून तेही नियमितपणे नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत होते. परंतू कुपनलिकेतूनही पाणी येत नसल्याचे चित्र आहे. आहे त्या कुपनलिका आटण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कुपनलिका असलेल्यांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.गेल्या काही वर्षांपासून बळसाणे ग्रामस्थांना सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. परिसरात पाणी, गुरांसाठी लागणारा चारा नसल्याने ग्रामस्थ, शेतकरी, पशुपालक सारेच हैराण झाले आहे. नळाला पाणी येत नसल्याने कामधंदा सोडून दिवसभर घरातील सदस्यांसह पिण्याच्या पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे.माळमाथा भागातील गावांमध्ये भीषण दुष्काळाचे सावट आहे. परिसरातील नदी, नाले, तलाव, कुपनलिकांमध्ये ठणठणाट असून पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. विश्लकल्याणकामार्फत तीन ते चार वेळा पाणी टँकरने पाणी पुरवठा होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, गुरांना मोठ्या प्रमाणावर पाणी लागत असून दिवसेंदिवस तापमानात अधिकाधिक वाढ होत आहे.बळसाणे ग्रामपंचायतीकडून नुकतेच जिल्हा प्रशासनाला बुराई नदीत पाणी सोडण्याबाबत निवेदन देण्यात आले असल्याचे सरपंच दरबारसिंग गिरासे यांनी सांगितले. तर शासनाने मागेल त्या गावाला चारा छावणी देणार असल्याचे जानेवारी महिन्यात घोषित करूनसुद्धा चारा छावण्या उपलब्ध होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गुरांसाठी लागणाऱ्या कडब्याचे दर गगनाला भिडले आहेत. सुमारे साडेतीन ते चार हजार प्रती शेकडा कडब्याचे दर आहेत. त्यात दुष्काळामुळे शेतकरी व मजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. त्यामुळे अगोदरच आर्थिक टंचाई जाणवत आहे.संबंधित विभागाने लवकरात लवकर बळसाणेसह माळमाथा भागात चारा छावण्यांना परवानगी देऊन व वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचा व बुराई नदीत पाणी सोडण्याचा प्रस्ताव मंजुर करावेत, अशी मागणी बळसाणेसह माळमाथा परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे