शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

गव्हाणे फाट्यावर पिकअप वाहनाचा अपघात, मजुरासह मुलगा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 22:09 IST

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग : २६ मजुर जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

धुळे : धुळ्याच्या दिशेने मजूर घेऊन येणाऱ्या पिकअप वाहनाचा अचानक टायर फुटला़ यामुळे पिकअप वाहन उलटल्याने अपघात झाला़ यात २ जणांचा जागीच मृत्यू झाला़ त्यात एक ३० वर्षीय अनोळखी तरुण आणि १२ वर्षाचा पवन जगन सोलंकी (रा़ नांद्या, सेंधवा, मध्यप्रदेश) या मुलाचा समावेश आहे़ तर, पिकअप वाहनात असलेले २६ मजूर जखमी झाले आहेत़मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील गव्हाणे फाट्यावर सकाळी ९ वाजेच्या सुमारास अपघात झाला़ मध्यप्रदेशच्या सेंधवा येथून एमपी ४६ जी २३२८ क्रमांकाच्या पिकअप व्हॅनमध्ये २५ ते ३० शेत मजूर धुळ्याच्या दिशेने निघाले़ ते शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी गावाच्या शिवारात एका शेतामध्ये कामासाठी जात होते़ अचानक व्हॅनचा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले़ काही समजण्याच्या आत व्हॅन रस्त्याच्या बाजुला फेकली गेली़ या अपघातामुळे व्हॅनमधील जवळपास सर्वच मजुरांना दुखापत झाली आहे़ तर पवन जगन सोलंकी (१२, रा़ नांद्या, सेंधवा, मध्यप्रदेश) या मुलाचा तर एका ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला आहे़ अपघातानंतर महामार्गावरुन वावरणाºया अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली़ प्रचंड आक्रोश यावेळी झाला़ जखमी आणि मृतांना पिकअप व्हॅनच्या बाहेर काढण्यात आले़ या अपघातामुळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थांसह नरडाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु व पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली़ जखमींना तातडीने नरडाणा, सोनगीर प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींना भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ त्याचप्रमाणे अपघाताच्या ठिकाणी शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, शिरपूरचे पोलीस उपअधीक्षक अनिल माने यांनीही घटनास्थळी भेट दिली़अपघाताच्या ठिकाणी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती़ कोरोनाच्या भीतीने जखमींना उचलण्यासाठी कोणीही पुढे सरसावत नव्हते़ पोलिसांनी प्रयत्न करुन जखमींना रुग्णालयात हलविले़ अपघाताच्या ठिकाणी मजुरांचे जेवणाचे डबे, चपला, त्यांच्यासोबतच्या वस्तू विखुरलेल्या दिसून आल्या़ ही व्हॅन रोज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सेंधव्याहून महाराष्ट्रात येते़ शेतीची दैनंदिन कामे आटोपल्यानंतर सायंकाळी ५ वाजता मजुरांना घेऊन ही व्हॅन परतीच्या प्रवासाला निघते़

टॅग्स :Dhuleधुळे