निबंध स्पर्धेत पायल सोनवणे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:35 IST2021-03-20T04:35:30+5:302021-03-20T04:35:30+5:30

जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्त्री शक्तीच्या पाऊलखुणा’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. या स्पर्धेत नाशिक, नंदुरबार, धुळे, ...

Payal Sonawane first in the essay competition | निबंध स्पर्धेत पायल सोनवणे प्रथम

निबंध स्पर्धेत पायल सोनवणे प्रथम

जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्त्री शक्तीच्या पाऊलखुणा’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. या स्पर्धेत नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना या जिल्ह्यातील ७५ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात प्रथम पायल गणेशसोनवणे (शहादा), द्वितीय भावना दिलीप बोरसे (शिरपूर), तृतीय क्रमांक शुभांगी अशोक ठोंबरे (जळगाव) हिने मिळविला, तर उत्तेजनार्थ बक्षीस मोक्षिका सुल्ताने हिला दिले. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा.विश्वास भामरे, डॉ. प्रदीप राठोड, डॉ. प्रीतम तोरवणे, डॉ. चंद्रकांत कढरे, प्रा. राजू देवकर यांनी काम पाहिले. यशस्वी स्पर्धकांचे विद्याविकास मंडळ संस्थेचे सचिव सुरेश पाटील, अध्यक्षा मंगला पाटील, उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. एल. तोरवणे, प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे, उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील, संयोजक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. लहू पवार, सहसंयोजक युवती सभाप्रमुख डॉ. ज्योती वाकोडे यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Payal Sonawane first in the essay competition