शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पांझरा चौपाटी नियमानुकूल करणारच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 23:27 IST

अनिल गोटे : प्रस्तावित कारवाईस महसूलमंत्र्यांची स्थगिती, १ एप्रिलला होणार सुनावणी, चौपाटीवर आनंदोत्सव

धुळे : शहरातील पांझरा चौपाटीवर १० मार्चला जिल्हा प्रशासनाकडून न्यायालयाच्या आदेशाने कारवाई करण्यात येणार होती़ मात्र पांझरा नदीकाठावरील चौपाटी नियमानुसार अनुज्ञेय आहे़ त्यामुळे महसूलमंत्र्यांनी चौपाटीवरील स्टॉलधारकांच्या रिव्ह्यू पिटिशनची १ एप्रिलला महसूलमंत्र्यांकडे सुनावणी असून शुक्रवारी होणाºया कारवाईला स्थगिती मिळाल्याचे आमदार अनिल गोटे यांनी चौपाटीवर पत्रकार परिषदेत जाहीर केले़ चौपाटी नियमानुकूल करणारच, अशी स्पष्टोक्तीही आमदार गोटे यांनी केली़शहरातील पांझरा चौपाटीबाबत न्यायालयाने चौपाटीवर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने जिल्हा प्रशासनाने चौपाटीवर २६ स्टॉलधारकांना नोटिसा बजावून ९ मार्चपर्यंत स्टॉल्स स्वत:हून काढून घेण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार गुरुवारी नोटिसीची मुदत संपुष्टात आल्याने पांझरा चौपाटीचे काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून होती़ प्रशासनाने कारवाईसाठी आवश्यक पूर्वतयारी केली होती़आमदार गोटेंची पत्रकार परिषद!आमदार अनिल गोटे यांनी रात्री आठ वाजता चौपाटीवर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली़ ड वर्ग महापालिकांमध्ये १ नोव्हेंबर २०१६ पासून नवीन बांधकाम नियमावली लागू झाली आहे़ त्यातील २२़३ च्या कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार,  लाल व निळ्या पूररेषेच्या आत पक्के बांधकाम करता येणार नाही, मात्र खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, भाजी मार्केट, फॅशनस्ट्रीट उभारता येईल़ त्यामुळे देवपूर सर्व्हे क्रमांक १३ अ हा पूर्णत: शासकीय मालकीचा असून तो बागेसाठी राखीव आहे़ त्यामुळे विकास योजनेतील बगिचा आरक्षणात स्टॉल्सचा वापर काही शर्ती व अटींना अधीन राहून काही प्रमाणात अनुज्ञेय आहेत, असे गोटे म्हणाले़ महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या चौपाटीबाबत आदेशानंतर विहित कालावधीत रिव्ह्यू पिटिशन पांझरा चौपाटी स्टॉल ओनर्स सोसायटीतर्फे दाखल करण्यात आले असून त्यावर १ एप्रिलला सुनावणी असल्याचे आमदार गोटे पत्रकार परिषदेत म्हणाले़ महसूलमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांना चौपाटीवरील कारवाई थांबवावी, असे आदेश दिल्याचे गोटे यांनी स्पष्ट केले़ स्टॉलधारकांकडून केवळ चौपाटीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च घेत असून त्यासाठी स्वतंत्र नोकर लावले आहेत़ पांझरा चौपाटी स्टॉल ओनर्स सोसायटीचे संपूर्ण आठ वर्षांचे लेखापरीक्षणदेखील केले असल्याचे आमदार गोटे यांनी सांगितले़कायकर्त्यांचा जल्लोष!आमदार गोटे यांनी चौपाटीवरील कारवाई टळल्याचे जाहीर केल्यानंतर लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी चौपाटीवर फटाक्यांची आतषबाजी केली व पेढे वाटून आनंद व्यक्त केला़ तसेच डफाच्या तालावर नृत्यही केले़लोकसंग्रामचे धरणे!पांझरा चौपाटीवरील प्रस्तावित कारवाईच्या पार्श्वभूमीवर लोकसंग्रामचे कार्यकर्ते व चौपाटीवरील स्टॉलधारक कुटुंबासह चौपाटीवर धरणे आंदोलनास बसले़  या वेळी चौपाटीच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या़ शुक्रवारपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगत याच ठिकाणी खिचडी शिजवून जेवण करण्यात आले़ चौपाटीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ गोटे यांची पत्रकार परिषद होईपर्यंत लोकसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते चौपाटीवर बसून होते़