शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

गजानन महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:10 IST

भक्तीपूर्ण वातावरण : अनेक भाविकांनी घेतले दर्शन, सायंकाळी झाला समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :गजानन महाराजांचा जयघोष करीत निघालेल्या पालखी सोहळ्यात शेकडो भाविकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला़ यावेळी भजन आणि मुलांच्या लेझिम नृत्यामुळे भक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते़ बालाजी मंदिरापासून निघालेल्या या पालखीचा समारोप वाडीभोकर रोडवरील मंदिरात करण्यात आला़वाडीभोकर रोडवर रामनगर परिसरात गजानन महाराजांचे मंदिर आहे़ दरवर्षाप्रमाणे यंदाही महाराजांचा प्रगट दिनाचा सोहळा १५ फेब्रुवारी रोजी श्री सदगुरु गजानन महाराज सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्यावतीने साजरा करण्यात येणार आहे़ त्या दिनाचे औचित्यसाधून महाराजांच्या मुखवट्याची पालखी काढण्यात येत असते़ दरवर्षी हा उपक्रम होत असतो़ यंदाही हा उपक्रम सोमवारी पार पडला़ शहरातील खोलगल्ली भागात असलेल्या बालाजी मंदिरापासून गजानन महाराजांच्या मुखवट्याची पालखी सकाळी काढण्यात आली़ तत्पुर्वी बालाजी मंदिरात निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली़ यावेळी मंडळाचे अध्यक्ष गोपाळराव केले सपत्नीक आणि मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते़ पुजा केल्यानंतर बालाजी मंदिरापासून पालखीला सुरुवात करण्यात आली़ पालखीच्या अग्रभागी हत्ती त्यानंतर मुलांचे लेझिम नृत्य, वारकऱ्यांचे भजनी मंडळ आणि वाद्यवृंद असल्यामुळे पालखी सोहळा देवपुर भागात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले़बालाजी मंदिरापासून निघालेली ही पालखी पुढे महात्मा गांधी पुतळा, मोठा पुल, पंचवटी, नेहरु चौकाकडून पुढे वाडीभोकर रोडने स्टेडीअममार्गे रामनगर भागात असलेल्या गजानन महाराजांच्या मंदिरात पालखीचा समारोप करण्यात आला़

टॅग्स :Dhuleधुळे