शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जयघोषाने अवघी आमळी नगरी दुमदुमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:40 IST

कन्हैय्यालाल महाराज यात्रोत्सव : पहिल्या दिवशी हजारो भाविकांकडून दर्शन, परराज्यातूनही हजेरी

दहिवेल : कार्तिकी एकादशीनिमित्त साक्री तालुक्यातील आमळी येथे श्री कन्हैय्यालाल महाराजांच्या यात्रोत्सवास शुक्रवारी अपूर्व उत्साहात सुरूवात झाली. कन्हैय्यालाल महाराजांच्या जयघोषाने पहिल्याच दिवशी आमळी नगरी दुमदुमली. संपूर्ण खान्देशसह राज्यभरातून तसेच मध्यप्रदेश, गुजरात राज्यांमधूनही भाविकांनी हजेरी लावली आहे.शुक्रवारी सकाळी ७ वाजता महापूजा, आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.यात्रोत्सवात पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते. त्यामुळे मंदिर परिसरासह दूर दूरवरुन आलेल्या भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरासह यात्रेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गर्दीमुळे हॉटेल सजली असून पाळणे, लोकनाट्य (तमाशा), खेळांचे साहित्य व फळांच्या दुकानांवरही गर्दी दिसत आहे.वाहने उभी करण्यासाठी (पार्किंग) व्यवस्था करण्यात आली आहे. मंदीर समितीच्यावतीने सर्व जय्यत तयारी करण्यात आली असून तीन दिवस यात्रोत्सव सुरूच राहणार आहे. यात्रेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.सकाळी प्रतिष्ठीत नागरिकांनी श्री कन्हैय्यालाल महाराजांचे दर्शन घेऊन यात्रोत्सवाची पाहणी केली. भाविकांसाठी रांगेची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सर्वांना सुरळीत दर्शन झाले.प्रसादाकरीता हजारो नारळांची विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. खजुराचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. श्रद्धेमुळे आदिवासी समाजबांधवांकडून मंदिर परिसरात रात्रभर भजनांचा कार्यक्रम सुरू असतो.परिसरातील दिंड्याही पोहचत असल्याने रात्रभर मंदीर परिसरात जागरणाचा कार्यक्रम सुरू असतो. यात्रोत्सवात वीज वितरण कंपनी, पोलीस आदी विभाग कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशीरापर्यंत दर्शन सोहळा सुरू होता.

टॅग्स :Dhuleधुळे