शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या जागाचे आरक्षण अमान्यचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:01 IST

आखाडे ग्रामपंचायत : आरक्षण सोडतीत दोन्ही सर्वसाधारण जागा महिलांसाठी निघाल्याने घेतला निर्णय

आॅनलाइन लोकमतनिजामपूर (जि.धुळे) :साक्री तालुक्यातील आखाडे ग्रामपंचायतीचे नुकतेच आरक्षण काढण्यात आले. यात खुल्या प्रवर्गासाठी दोन जागा असून, दोन्ही जागा या स्त्रियांसाठी राखीव आहेत. त्याऐवजी एक जागा सर्वसाधारण गटातील पुरूषांसाठी असावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. दरम्यान खुल्या प्रवर्ग आरक्षण अमान्य असल्याचा ठराव विशेष ग्रामसभेत करण्यात आला आहे. ठरावाची प्रत तहसीलदारांना देण्यात आली.३ फेब्रु.रोजी आखाडे ग्रामपंचायत कार्यालयात गट विकास अधिकारी यांच्या पत्रांनुसार दुपारी विशेष ग्रामसभा सरपंच श्रावण भवरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. साक्री तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी उमेदवार आरक्षण वाचन केले. यावेळी नायब तहसीदार विनोद ठाकूर हेदेखील ा उपस्थित होते.एकूण ३ प्रभागात ९ जागा आहेत. अनु.जमाती ४ जागा (२ पु.आणि २ स्त्री),अनु.जाती १ जागा पुरुष, नागरिकांचा मागास प्रवर्गच्या दोन जागा(१ पु.आणि १ स्त्री), तर सर्वसाधारण दोन जागा आहेत. दरम्यान प्रभाग १ व तीन मधील ज्या दोन सर्वसाधारण जागा आहे. त्याचे आरक्षण स्त्रियांसाठी निघाले आहे. नेमकी या बाबत हरकत घेण्यात आली. यापैकी एक जागा पुरुष उमेदवारासाठी असावी असे उपसरपंच शिवलाल ठाकरे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.ज्यांच्याडे जातीचा दाखला नाही अश्या व्यक्तीस उभे राहण्यासाठी खुल्या प्रवर्गाची एकही जागा नसल्याने तो अन्याय ठरतो.या ग्रामसभेत खुल्या प्रवर्गाचे आरक्षण अमान्य असल्याचा ठराव झाला. उपसरपंच शिवलाल ठाकरे,सदस्य,ग्रामसेवक महारु गायकवाड, ग्रामस्थ हजर होते.विशेष सभा ठराव प्रत दुपारी साक्री येथे तहसीदार याना देण्यात आली.

टॅग्स :Dhuleधुळे