जुनी ओळख महागात पडली, व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:32 AM2021-03-07T04:32:58+5:302021-03-07T04:32:58+5:30

चाळीसगाव रोडवरील राजवाडे नगरात राहणाऱ्या भावेश राजेंद्र शर्मा या व्यावसायिकाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, जुन्या ओळखीचा फायदा घेत विश्वास ...

The old identity cost dearly, a merchant a bribe of five lakhs | जुनी ओळख महागात पडली, व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा

जुनी ओळख महागात पडली, व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा

Next

चाळीसगाव रोडवरील राजवाडे नगरात राहणाऱ्या भावेश राजेंद्र शर्मा या व्यावसायिकाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, जुन्या ओळखीचा फायदा घेत विश्वास संपादन करून अमोल दिलीप अमृते (रा. नित्यानंद कॉलनी, नटराज टॉकीजमागे, ८० फुटीरोड, धुळे) याने भावेश शर्मा यांच्याकडून पाच लाख रुपये हातउसनवारीने घेतले. वर्षभरात परत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. पाच लाखांच्या मोबदल्यात त्याने धनादेश दिला होता. वर्षभरानंतर भावेश यांनी तो धनादेश वटविण्यासाठी बँकेत टाकला असता तो वटला नाही. परिणामी भावेश यांनी अमृतेकडे पाच लाखांच्या पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देत तुला जे करायचे ते कर असा दम भरला. पैसे परत मिळत नसल्याने भावेश यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाणे गाठत आपबीती कथन केली. त्यानुसार, फिर्याद दाखल केल्याने भादंवि कलम ४२०, ४०६ प्रमाणे संशयित अमोल दिलीप अमृते विरुद्ध गुन्हा दाखल झाला. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत करीत आहेत.

Web Title: The old identity cost dearly, a merchant a bribe of five lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.