धुळे जिल्हा परिषदेत चौकशीसाठी आलेला अधिकारी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 12:48 PM2020-09-17T12:48:34+5:302020-09-17T12:48:55+5:30

संपर्कात आलेले काही अधिकारी व कर्मचारी झाले क्वारंटाईन

An officer who came to Dhule Zilla Parishad for interrogation was obstructed | धुळे जिल्हा परिषदेत चौकशीसाठी आलेला अधिकारी बाधित

धुळे जिल्हा परिषदेत चौकशीसाठी आलेला अधिकारी बाधित

googlenewsNext

आॅनलाइन लोकमत
धुळे :जिल्हा परिषदेतील गैरव्यवहार प्रकरणी विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमिवर नाशिक विभागीय कार्यालयातील दोन अधिकारी चौकशीसाठी धुळ्यात आले होते. मात्र यापैकी एका अधिकाऱ्याचा रिपोर्ट मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने, त्यांच्या संपर्कात आलेले अधिकारी कॉरन्टाईन झाले आहेत.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा, बांधकाम समितीची सभा, स्थायी समितीच्या सभेत नियम डावलून आयत्या वेळेच्या विषयात धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेण्यात आले. याविषयीची तक्रार महाविकास आघाडीचे गटनेते पोपटराव सोनवणे यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार ग्रामविकास विभागाने विभागीय आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. स्थायी समितीच्या ३ मार्च, ३० एप्रिल, २९ मे, २६ जून रोजी झालेल्या सभेसह व ११ मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत आर्थिक आणि धोरणात्मक विषय आयत्या वेळेच्या विषयांमध्ये घेण्यात आल्याची तक्रार पोपटराव सोनवणे यांनी केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयातील दोन सदस्यीय चौकशी समिती जिल्हा परिषदेत दाखल झाली. नाशिक येथील दोन अधिकाऱ्यांचा समावेश होतो.
या समितीने मंगळवारी बांधकाम, सिंचन विभागाच्या मंजुरी दिलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. समितीचे अधिकारी बुधवारीही विविध कागदपत्रांची तपासणी करणार होते.
दरम्यान या समितीच्या संपर्कात जिल्हा परिषदेतील प्रमुख अधिकारी आले होते. त्याचबरोबर या सर्व विभागाचे काही कर्मचारीही या समिती सदस्यांच्या संपर्कात आले होते. चौकशी समितीमधील एका अधिकाºयाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचाचा मेसेज येथील अधिकाºयांना प्राप्त झाला. चौकशी समितीतील अधिकारीच पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. सर्वच अधिकारी कॉरंटाईन झाल्याचे सांगण्यात आले.या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: An officer who came to Dhule Zilla Parishad for interrogation was obstructed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे