शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत रांगेत नंबर लावण्यावरून तरुणाला बेदम मारहाण

By admin | Updated: April 28, 2017 01:03 IST

अवधान येथील घटना : चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे : बँकेत रांगेत नंबर लावण्यावरून एका तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण करून जखमी केल़े ही घटना सोमवारी दुपारी तालुक्यातील अवधान येथील एस़बी़आय. बँकेच्या शाखेजवळ घडली़ याप्रकरणी चौघांविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े कृष्णा प्रल्हाद पारखे (रा़ म्हाडा वस्ती, दंडेवालाबाबानगर, मोहाडी) असे जखमी तरुणाचे नाव आह़े तो सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अवधान येथील एस़बी़आय. बँक शाखेत पैसे भरण्यासाठी गेला होता़ तेथे रांगेत उभे असताना नंबर लावण्यावरून व माङयाजवळ जास्त पैसे आहेत, असे त्याने सांगितल़े या कारणावरून प्रीतेश वाघ, शुभम वाघ, दत्तू मराठे व सावकारे (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा़अवधान या चौघांनी तरुणाला हाताबुक्क्यांनी मारहाण केली़ त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली़ याप्रकरणी कृष्णा पारखे याने मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध भादंवि कलम 326, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रामराजे करीत आहेत़ घोडदे येथे एकास मारहाणपत्नीकडे जेवण मागत असताना जेवण बनविले नाही, या कारणावरून समाधान बापू सतोळे (रा़ घोडदे, ता़ साक्री) यांना राधाबाई समाधान सताळे, आनंद राजाराम माळी, चिल्या भिकन माळी, भु:या आनंद माळी व भिल्या भिकन माळी (सर्व रा़ घोडदे) यांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण केली़, तसेच शिवीगाळ करून धमकी दिली़ ही घटना 14 एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी समाधान सतोळे यांच्या फिर्यादीवरून वरील पाच जणांविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात भादंवि कलम 325, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ह़ेकॉ. पाटील करीत आहेत़ रॉकेल प्राशन केल्याने बालकाचा मृत्यूधुळे शहरातील वडजाई रोडवरील शहादत्तनगरात राहणारा मुन्ना शहा रफिक शहा (वय 7) या बालकाने मतिमंद अवस्थेत मंगळवारी रात्री 11़ 45 वाजेच्या सुमारास रॉकेल प्राशन केल़े त्रास होऊ लागल्याने त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल़े तेथे डॉ़ दीपाली वाडेकर यांनी तपासणी करून बालकाना मृत घोषित केल़े याबाबत पो़कॉ.सुरेश पाटील यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े