शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांच्या संख्येने १४ हजारांचा टप्पा ओलांडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 11:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे जिल्ह्यातील आणखी १८ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्येने १४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे जिल्ह्यातील आणखी १८ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्येने १४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १४ हजार १३ इतकी झाली आहे. त्यापैकी १३ हजार ४३० रुग्ण बरे झाले आहेत तर ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय धुळे येथील ८७ अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले.अभियंता नगर २, मोहाडी उपनगर १ व सुभाष नगर येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील सर्व ४३ अहवाल निगेटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १४२ अहवालांपैकी महालक्ष्मी कॉलनी शिरपूर येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आला.महानगरपालिका रॅपिड अँटीजन टेस्ट मधील १८१ अहवालांपैकी पारधीवाडा धुळे येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ८ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, देवपूर व पिंपळनेर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.खाजगी प्रयोगशाळा-७ अहवालापैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात वसंत नगर धुळे १, वरचे गाव शिरपुर १, शिरुड धुळे १ यांचा समावेश आहे.उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा-येथील रॅपिड अँटीजन टेस्टच्या २७ अहवालांपैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, आनंद नगर दोंडाईचा २, मेथी २, साखरी ता. शिंदखेडा १ व सिंधी कॉलनी दोंडाईचा येथील एका रुग्णाचा समावेश आल्याची माहिती देण्यात आली.