शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

आता सकाळीच अकराच्या आत.... घरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST

शासकीय बैठकीत निर्णय किराणा खरेदी करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिक दिवसभर फिरताना दिसतात. त्यावर पायबंद घालण्यासाठी राज्य स्तरावरुन कठोर निर्णय ...

शासकीय बैठकीत निर्णय

किराणा खरेदी करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिक दिवसभर फिरताना दिसतात. त्यावर पायबंद घालण्यासाठी राज्य स्तरावरुन कठोर निर्णय घेतला जावा त्यासाठी राज्यातील किराणा दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ यावेळेत सुुरु ठेवण्याचा निर्णय घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरु झाली आहे.

आदेशाची अंमलबजावणी सुरु

सकाळी ७ वाजेपासून ते ११ वाजेपर्यंत किराणा, भाजीपालासह सर्व दुकाने सुरळीत सुरु राहतील. पण, त्यानंतर अत्यावश्यक सेवेत मेडिकल, दवाखाना वगळता सर्वच बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून पारित होताच पोलीस रस्त्यावर उतरले. महात्मा गांधी पुतळ्यापासून दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत पाचकंदिल चौकासह त्याच्याही पुढे हा ताफा रवाना झाला. दुकानांसह भाजीपाला आणि फळविक्रेत्यांसह सर्व लोटगाडीधारकांना हटविण्यात आले. हीच मोहीम आग्रा रोडसह अन्य ठिकाणी राबविण्यात आल्याने सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने बंद करण्यात आल्यामुळे शुकशुकाट पसरला.

पाचकंदिलही शांत

सकाळपासून गजबजणारा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला पाचकंदिल चौकाने सकाळी साडेअकरा वाजेनंतर मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली. नाहीतर याच चौकात भाजी विक्रेते, फळ विक्रेते, शहरानजिकच खेडे गावात जाण्यााठी रिक्षा यांची वर्दळ दिवसभर सुरु असते. शहरातील बहुतेक जणांना पाचकंदिल चौकात येऊन खरेदी केल्याचे समाधान मिळत नाही. दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत असताना खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना देखील पिटळण्यात आले.

नागरिकांची भटकंती थांबली

१५ एप्रिल पासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. अत्यावश्यक सुविधांना त्यातून वगळले होते. मात्र विनाकारण फिरणारे अत्यावश्यक सुविधांची ढाल वापरत दिवसभर भटकंती करताना दिसत होते. एखाद्या दवाखान्याची फाईल अथवा पिशवी घेवून दवाखान्यात चाललो, औषधी गोळ्या घ्यायच्या आहेत, बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी चाललो अशी काही कारणे पुढे करुन बहुतेेकांची भटकंती सुरु होती. परिणामी लावण्यात आलेला लॉकडाऊन केवळ नावालाच होता. सोमवारी राज्य शासनाने निर्बंध अधिक कडक करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दुकानांसाठी सकाळी ते ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ११ वाजेनंतर शुकशुकाट होण्यास सुरुवात झाली. नागरिकांची विनाकारण होणारी भटकंतीही थांबली.

पाेलीस बंदोबस्त

शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे व विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षकांसह अन्य अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरुन बंदचे आवाहन केले. परिणामी सकाळी ११ वाजेनंतर सर्वत्र शुकशुकाट होण्यास सुरुवात झाली होती.

व्यापाऱ्यांनीही दिला प्रतिसाद

सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व सुरु राहील त्यानंतर दुकाने बंद करण्याचे आदेश पारीत झाल्यानंतर आणि पोलिसांकडून करण्यात आलेल्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिला. आपापली दुकाने बंद करुन घरी राहणे पसंत केले. परिणामी गजबजणारी ठिकठिकाणची बाजारपेठ दुपारपर्यंत शांत झाली होती.