राष्टÑवादी काँग्रेसमध्ये नव्या-जुन्याचा वाद उफाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:21 PM2020-09-20T13:21:46+5:302020-09-20T13:21:46+5:30

माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या अवतीभोवतीच फिरत राहिले

New-old controversy erupted in the Nationalist Congress | राष्टÑवादी काँग्रेसमध्ये नव्या-जुन्याचा वाद उफाळला

राष्टÑवादी काँग्रेसमध्ये नव्या-जुन्याचा वाद उफाळला

Next

राजेंद्र शर्मा

जिल्ह्यात काँग्रेस पाठोपाठ आता राष्टÑवादी काँग्रेसतर्फे पक्ष संघटन उभे करण्यासाठी प्रदेशतर्फे पक्ष निरीक्षक म्हणून अविनाश आदिक आणि अर्जून टिळे हे जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले. जिल्हा दौºयात दोघांनी तालुकानिहाय आढाव बैठकी घेतल्या. या आढावा बैठकीत शिरपूर आणि धुळे तालुका राष्टÑवादी काँग्रेसच्या बैठकीत गोंधळ झाला होता. पक्षात नवा व जुना असा वाद उफाळून आला होता. तेव्हा पक्ष निरीक्षकांनी शेवटी यावर तोडगा काढीत वन टू वन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आढावा बैठकीत बºयाच पदाधिकाऱ्यांनी संघटन मजबुतीसाठी आणि पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी नवीन लोकांना संधी देण्यात यावी, अशी मागणी केल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.
तसे पाहता सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील राष्टÑवादीचे राजकारण हे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या अवतीभोवतीच फिरत राहिले आहे. त्यांनीच जिल्ह्यात राष्टÑवादीला चेहरा दिला. शिंदखेडा तालुक्यातून माजी आमदार डॉ.हेमंत देशमुख यांची त्यांना साथ मिळाली होती.पण डॉ.हेमंत देशमुख हे जेव्हा दोंडाईचा येथे एकाकी पडले, तेव्हा त्यांनी राष्टÑवादीला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी पक्षाची साथ सोडत अपक्ष उमेदवारी केली आणि निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश केला. या दोन्ही नेत्यांनी पक्षत्याग केल्यानंतर राष्टÑवादी काँग्रेसमध्ये राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी जिल्हाध्यक्ष किरण गुलाबराव पाटील, इर्शाद जहागीरदार, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष रणजीतराजे भोसले अशी बोटावर मोजण्याइतकीच मंडळी उरली होती. या जुन्या मंडळींसोबत विधानसभा निवडणुकीनंतर शिरपूर तालुक्यातून डॉ.जितेंद्र ठाकूर आणि धुळ्यातून माजी आमदार अनिल गोटे यांनी राष्टÑवादीत प्रवेश केला. गोटे यांना पक्षाने प्रदेश उपाध्यक्षपद आणि धुळे व नंदुरबार जिल्हा प्रभारी म्हणून पक्ष संघटन उभे करण्याची जबाबदारी दिली. पक्ष प्रवेशानंतर माजी आमदार गोटे यांनी दोन्ही जिल्ह्यांचा दौरा केला. दौºयात त्यांनी पक्षावर निष्ठा ठेवणाºयांना स्थान आहे. मात्र, पक्षाचा झेंडा घेऊन दुसºयाचे काम करणाºयांना स्थान नाही, असे ठणकावून सांगितले होते. परंतू कोरोना महामारीच्या संसर्गानंतर त्यांच्या दौºयांना ब्रेक लागला आहे. दरम्यानच्या काळात पक्ष निरीक्षक अविनाश आदिक आणि अर्जून टिळे हे गेल्या आठवडयातच जिल्हा दौºयावर आले. त्यात पक्षात नव्या- जुन्याचा वाद उफाळून आला. या दौºयाच्या वेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार अनिल गोटे हे बैठकीस उपस्थित नव्हते. तसेही त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षांच्या ज्या बैठकी झाल्यात त्यात अगदी बोटावर मोजण्या इतक्याच बैठकींना उपस्थिती दिली आहे. त्याप्रमाणेच पक्ष निरीक्षकांच्या या बैठकीसही ते उपस्थित नव्हते. ते कामानिमित्त मुंबईला असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. त्यानंतर गोटेंच्या नेतृत्वाखाली धुळयातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा निर्यातबंदीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच नव्या - जुन्या नेत्यांनी हजेरी लावली. पक्ष निरीक्षकांसमोर उफाळून आलेला नवा - जुन्याच्या वादावर लवकर पडदा पडणे, हे पक्ष संघटनच्या दृष्टीने आवश्यक असल्याने प्रदेश उपाध्यक्ष म्हणून माजी आमदार अनिल गोटे आणि पक्ष निरीक्षकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रदेश राष्टÑवादी काँग्रेसचे नेते यावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
काँग्रेसमधील नेतृत्व बदलाचे वारे- राष्टÑवादी सोबतच जिल्ह्यातील त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसमध्येही आता जिल्ह्यात नेतृत्व बदलाचे वारे वाहत आहेत. आतापर्यंत जिल्हा काँग्रेसवर अँकर गटाचे वर्चस्व होते. जवळपास सर्वच प्रमुख पदे त्यांच्या गटाकडे होती. परंतू अँकर गटाचे प्रमुख नेते माजी आमदार अमरिशभाई पटेल यांच्या भाजप प्रवेशानंतर अँकर गट संपल्यात जमा झाला आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळविणारे आमदार कुणाल पाटील यांचे जिल्ह्यात वर्चस्व वाढले आहे. त्याचे चित्र जिल्हा युवक काँग्रेस आणि अन्य नियुक्तीमध्ये स्पष्ट दिसते. पक्षात शिल्लक असलेल्या अँकर गटातील नेतेमंडळींनीही आता आमदार कुणाल पाटील यांच्याशी जमवून घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात पक्ष निरीक्षक मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील तालुकानिहाय झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांना मंत्रीमंडळात स्थान देण्याची मागणी केली. शेवटी धुळे तालुक्याच्या बैठकीत पक्ष निरीक्षक मुझफ्फर हुसेन यांनी लवकरच त्यांच्यावर जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात येईल, असे स्पष्ट संकेत दिले. पण विद्यमान जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर हे १२ वर्ष या पदाची धुरा सांभाळत आहेत. ते अँकर गटाचे मानले जातात. पण अँकर गटाचे सर्व प्रमुख नेते भाजपमध्ये गेल्यानंतरही त्यांनी पक्ष सोडला नाही. म्हणून आता त्यांच्याकडून जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी काढून घेतांना त्यांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यांचे पुनर्वसन केल्यानंतरच जिल्हाध्यक्ष पदाची धुरा आमदार कुणाल पाटील यांना दिली जावी, असा एक नवीन विचार पुढे येत आहे. दरम्यानच्या काळात काँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे हे देखील बदलले आहेत. त्यामुळे आता हा विषय थोडा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: New-old controversy erupted in the Nationalist Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे