विलगीकरणासाठी ग्रामपालिकेचे प्रयत्न सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:35 IST2021-04-11T04:35:09+5:302021-04-11T04:35:09+5:30

निजामपूर ग्राम सचिवालयात गुरुवारी सकाळी सर्व डाॅक्टर्स यांची बैठक आयोजित केली होती. कोरोना ...

Municipal efforts for segregation continue | विलगीकरणासाठी ग्रामपालिकेचे प्रयत्न सुरू

विलगीकरणासाठी ग्रामपालिकेचे प्रयत्न सुरू

निजामपूर ग्राम सचिवालयात गुरुवारी सकाळी सर्व डाॅक्टर्स यांची बैठक आयोजित केली होती. कोरोना प्रादुर्भाव संदर्भात ग्रामपालिकेने ग्रामस्थांच्या सुरक्षेविषयी डॉक्टरांचे विचार ऐकून त्यांना येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या. डाॅक्टरांनी चिंता व्यक्त केली की, लोक कोरोना आजाराला घाबरून व ते लपवून अंगावर काढण्याचे प्रकार करीत आहेत. त्यांनी तसे करू नये. वेळेवर उपचार घेतले पाहिजेत. कोरोना चाचणी करून घेतली पाहिजे. त्यामुळे कोरोना संक्रमणाचे वेळीच निदान होऊ शकते. उपचार घेऊन स्वतः विलगीकरण करून आपला परिवार बाधित होण्यापासून रोखता येऊ शकते. शासनाने निजामपूर जैताणे परिसरात कोविड सेंटर सुरू केले, तर येथील स्थानिक डॉक्टर आळीपाळीने वेळ सेवा देतील, असे आश्वासन दिले. ग्रामपालिकेने लाॅकडाऊन घेतल्याचे निर्णयाचे व ग्रामस्थांनी काटेकोरपणे नियमांचे पालन केल्याचा परिणाम चांगला आला आहे. निजामपूर येथे रुग्ण कमी झाल्याचे मिलिंद भार्गव यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच महेंद्र वाणी, सदस्य परेश वाणी, गजानन शाह, प्रकाश बच्छाव आणि निजामपूर, जैताणे येथील डॉक्टर्स उपस्थित होते.

Web Title: Municipal efforts for segregation continue