लॅाकडाऊनमध्येही मांस विक्रीचे दुकाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:35 IST2021-04-10T04:35:15+5:302021-04-10T04:35:15+5:30

कोरोनाचे मालपुरात थैमान सुरू असून मृतांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ग्रामस्थ आधीच भयभीत दिसून येत आहेत. गावातील अनेकजण वेगवेगळ्या ...

Meat shops also opened in Lakdown | लॅाकडाऊनमध्येही मांस विक्रीचे दुकाने सुरू

लॅाकडाऊनमध्येही मांस विक्रीचे दुकाने सुरू

कोरोनाचे मालपुरात थैमान सुरू असून मृतांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ग्रामस्थ आधीच भयभीत दिसून येत आहेत. गावातील अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी खासगी रुग्णालयात दाखल आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दहा दिवसांचा लॅाकडाऊन जाहीर करण्यात आला. त्याला व्यावसायिक चांगला प्रतिसाद देत आहेत. मात्र, मांसविक्री करणाऱ्यांची दुकाने खुलेआम सुरू आहेत. तर हातावर पोट असणाऱ्यांच्या व्यवसायावर टाच का ,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इतर ठिकाणी पोलीस पाटील कडक लक्ष ठेवतात. मात्र या ठिकाणी सोयीस्करपणे डोळेझाक का करतात, असे प्रश्न सर्वसामान्य मालपूरकरांना पडले आहेत. काही व्यावसायिक लॅाकडाऊनला हरताळ फासत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Meat shops also opened in Lakdown