शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल डिस्टन्स ठेवत पार पडला विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:03 IST

दोंडाईचा : अवघे सातजण उपस्थित, मास्क लावूनच पुरोहिताने म्हटली मंगलाष्टके

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : कोरोना या संसर्गजन्य आजाराने देशात हाकाकार उडविल्यामुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे लग्नसोहळेही रद्द केले आहे. मात्र अशा परिस्थितीत दोंडाईचात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून अवघ्या सात जणांच्या उपस्थितीत दोंडाईचात आदर्श विवाह पार पडला. या विवाह सोहळ्याची शहरात चर्चा सुरू आहे.शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहिरे येथील बी. एच. पाटील हे दोंडाईचा येथे पार्श्वनाथ नगरात वास्तव्यास आहे. ते झोतवाडे येथील समता विद्यालयात शिक्षक आहेत. त्यांचा मुलगा डॉ.राहुल पाटील यांचा विवाह नांदगाव तालुक्यातील न्याय डोंगरी येथील संतोष शिंदे यांची कन्या नंदिनी हिच्याशी निश्चित झाला होता.हा विवाह ८ मे ला होता. परंतु ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. कोरोनाची महामारी व आलेले राष्ट्रीय संकट याचा विचार करता राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पाटील व शिंदे परिवाराने साध्या पद्धतीने २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. यावेळी वरपिता बी. एच. पाटील व वधुपिता संतोष शिंदे ,भटजी व अन्य दोन जण यांचा उपस्थितीत.ची राहुल व नंदिनी यांची रेशीम गाठी पार्श्वनाथ नगरचा घरी बांधल्या गेल्यात.लॉकडाउनचे तंतोतंत पालन करीत सोशल डिस्टन्स राखत, तोंडाला मास्क लावत, भटजींनी मंगलाष्टके म्हटली. विवाहासाठी वाजंत्री, मंडप ,जेवणावळी नव्हती. या विवाह मुळे वर व वधू पित्याचा लाखो रुपयांचा खर्च वाचला असून नातेवाईकांची पण धावपळ वाचली आहे.या आदर्श विवाहाची चर्चा दोंडाईचा सह परिसरात होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे