पळवुन नेऊन विवाहितेवर अत्याचार

By Admin | Updated: April 25, 2017 18:15 IST2017-04-25T18:15:24+5:302017-04-25T18:15:24+5:30

शिरपुर तालुक्यातील केतारीपाडा, करवंद येथे 19 वर्षीय विवाहितेला पळवून नेऊन घरात डांबून अत्याचार केल्याची घटना समोर आली आह़े

Marital rapes and marriages | पळवुन नेऊन विवाहितेवर अत्याचार

पळवुन नेऊन विवाहितेवर अत्याचार

 धुळे,दि.25 - शिरपुर तालुक्यातील 19 वर्षीय विवाहितेला पळवून नेऊन घरात डांबून अत्याचार केल्याची घटना समोर आली आह़े याप्रकरणी शिरपुर शहर पोलिसात सोमवारी रात्री दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल आह़े दोघे फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध घेत आहेत़ 

शिरपुर तालुकयातील पिडीत महिलेने शिरपुर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार, ती शिरपुरातील आकाश  गार्डन रोडजवळ उभी असतांना तिच्याजवळ तंटय़ा चिमा पावरा (रा़ गधडदेव ता़ शिरपुर) हा रिक्षा घेऊन आला़ तेव्हा पिरा पावरा हा रिक्षेत बसलेला होता़ दोघांनी महिलेला जबरीने रिक्षेत बसविल़े नंतर तंटय़ा पावरा याने महिलेला पिरा पावरा यांच्या ताब्यात दिल़े त्याने महिलेला लगA करण्याबाबत दम दिला़  व तीन ते चार दिवस घरात कोंडून ठेवल़े तेथे पिरा पावरा याने पिडीत महिलेवर अत्याचार केला़ हा प्रकार दहा ते बारा दिवसांपूर्वी केतारीपाडा, करवंद (ता़ शिरपुर) येथे घडला़ 

Web Title: Marital rapes and marriages