अक्कलपाडाचे पाणी पांझरेत सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST2021-04-21T04:35:43+5:302021-04-21T04:35:43+5:30

धुळे तालुक्यातील पांझरा नदी काठावरील भदाणे, नेर, अकलाड, मोराणे प्र. नेर, कुसुंबा, खेडे, कुंडाणे, वार, मोराणे प्र. ल., महिंदळे, ...

Leave the water of Akkalpada in the pan | अक्कलपाडाचे पाणी पांझरेत सोडावे

अक्कलपाडाचे पाणी पांझरेत सोडावे

धुळे तालुक्यातील पांझरा नदी काठावरील भदाणे, नेर, अकलाड, मोराणे प्र. नेर, कुसुंबा, खेडे, कुंडाणे, वार, मोराणे प्र. ल., महिंदळे, नकाणे, कुंडाणे (निमखेडी), वरखेडी, जापी, शिरडाणे, न्याहळोद, तामसवाडी, हेंकळवाडी, नगाव तसेच शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातील काही गावातील पाणी पुरवठा योजनांचा उद्भव पांझरा नदीत किंवा नदी किनारी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पांझरा नदीतून पाणी वाहात नसल्याने हे उद्भव आटायला लागले असल्याने या व पुढील इतर गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने काही गावांमध्ये साथीचे रोग डोके वर काढत आहेत. या गावातील ग्रामस्थांनी तातडीने अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. तरी अक्कलपाडा धरणातून आर्वतन पांझरा नदीत सोडण्याचे जलसंपदा विभागाला आदेश द्यावेत, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी आपल्या पत्रातून केली आहे. अक्कलपाडा धरणाचे पाणी पांझरा नदीत सोडल्यास पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Leave the water of Akkalpada in the pan