शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलमध्ये पार्किंग सुविधेचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 23:11 IST

धुळे : दोन मजली इमारत असती तर झाली असती सुविधा, तहसीलदारांचे वाहन उभे राहते प्रवेशद्वारात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळे ग्रामीण तहसील कार्यालयाची नवीन इमारत काहीवर्षांपूर्वीच बांधण्यात आली. मात्र या इमारतीत वाहन पार्किंगची सुविधा नसल्याने, अनेकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागातात. त्यामुळे या वर्दळीच्या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. विशेष म्हणजे प्रवेशद्वारासमोरच तहसीलदारांचे वाहन उभे केले जात असल्याने, या कार्यालयात येणाऱ्या-जाणायांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असतो. अधिकाऱ्यांचेच वाहन रस्ता अडवित असेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.शहरात जुन्या मामलेदार कार्यालयाच्या जुनी इमारतीच्या जागेवर शासनाच्या निधीतून तहसिलदार कार्यालयाची नवीन इमारत उभारली गेली. मात्र परिसरात मोकळी जागा असतांना तालुका पोलिस ठाण्याच्या शेजारी अतिशय अडचणीच्या जागेत ही इमारत उभारली गेली. इमारतीच्या पुढील दर्शनीभागात चार ते पाच फुटाची बोळ सोडून तेथे अधिकारी,कर्मचारी व कार्यालयात येणा?्या नागरीकांच्या वाहनाची पार्किंगची सोय करण्यात आली. मात्र तहसिलदार कार्यालयाचा व्यप लक्षात घेता ही जागा कर्मचा?्यांच्या वाहनासाठीही पुरत नाहीत. त्यामुळे कामानिमित्त येणारे नागरीक परिसरात मिळेल त्याठिकाणी बेशिस्तपणे आपली वाहने पाकिग करीत असतात. वाहन पार्किंगसाठी कोणत्याही प्रकारची स्वतंत्र सोय नसल्याने नागरीकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. जुन्या मामलेदार कार्यालयात तलाठी कार्यालय, रेकार्ड रूम,तलाठी पतसंस्थेचे कामकाज चालते. त्याठिकाणीही अनेक जण दिवसभर येतात. त्यांच्याकडूनही तेथेच वाहने बेशिस्तपणे पार्किंग केली जातात. त्यामुळे परिसरातून तहसिलदार कार्यालयात नागरीकांना बेशिस्त लावलेली वाहने तुडवित आतमध्ये जावे लागते. येथे पार्किंगची सुविधा करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.तहसिलदार कार्यालयाच्या आवारातील बेशिस्त वाहन पार्किंगसह कार्यालयाच्या संरक्षण भिंतीलगतच काही चहा विक्रेते, गॅरेज व इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण करुन स्टॉल लावले आहेत़ याशिवाय झेरॉक्स व इतर शासकीय योजनाचे अर्ज विक्री करणारे काही चालतीफिरती (वाहनातील ) दुकानेही लावली जातात. तर काही चारचाकी वाहनेही याठिकाणी कायम स्वरूपी उभी असतात. याशिवाय कार्यालयात वाहनपार्किंगची सोय नसल्याने अनेक नागरीक कार्यालयासमोरी दुकानासमोर व इतर रस्त्यावर लावतात. त्यामुळे अगोदरच अरूंद असलेला रस्ता अधिक अरूंद होवून त्याचा वाहतूकीला अडथळा होतो.त्यामुळे या रस्त्यावर दिवसातून अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या उदभवते़ तहसिल कार्याजवळ जवळ झालेली वाहतूक कोंडींची समस्या नित्याची बाब बनली आहे़ वाहनचालकांसह वाहतूक शाखेच्या पोलिसांनाही डोकेदुखी ठरत आहे़तहसिल कार्यालयाची इमारत एक मजली करण्यात आली़ तसेच चारही बाजूला कार्यालय व मध्यभागी मोकळी जागा सोडल्यामुळे बाजूला जागा शिल्लक राहिली नाही़ त्याऐवजी वाडीभोकर रोडवर ज्याप्रमाणे पंचायत समितीची इमारतीचे बांधकाम केले गेले, त्याप्रमाणे इमारत उभारुन तळमजल्यावर वाहन पार्किंग केली असती तर आज हा प्रश्न निर्माण झाला नसता़ मात्र इमारतीच्या नियोजनात फेरबदल केले गेल्याचे संबंधितांकडून सांगितले जाते़

टॅग्स :Dhuleधुळे