कोविड सेंटरला ॲाक्सिजन सिलिंडर दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:33 IST2021-04-12T04:33:54+5:302021-04-12T04:33:54+5:30

दोडाईचासह ग्रामीण भागात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. व्हेंटिलेटर व ऑक्सिजनअभावी कोविड रुग्ण मरण पावत आहे. उपजिल्हा रुग्णालय ...

The Kovid Center was given an oxygen cylinder | कोविड सेंटरला ॲाक्सिजन सिलिंडर दिले

कोविड सेंटरला ॲाक्सिजन सिलिंडर दिले

दोडाईचासह ग्रामीण भागात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. व्हेंटिलेटर व ऑक्सिजनअभावी कोविड रुग्ण मरण पावत आहे. उपजिल्हा रुग्णालय सह कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे.या जाणिवेने-हस्ती ग्रुपचे अशोक जैन यांचा मार्गदर्शनाने कोविड केअर सेंटरला तीन लाख रुपये किमतीचे २० मोठे सिलिंडर प्रदान करण्यात आलेत. शिंदखेडा तालुका आरोग्य अधिकारी यांनी ऑक्सिजन सिलिंडरची मागणी केली होती. त्यानुसार हस्ती बँकेच्या संचालक मंडळाने तातडीने सिलिंडर उपलब्ध करून दिले. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना या ऑक्सिजन सिलिंडरमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सदर सिलिंडर हस्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कैलास जैन, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरिया, सरव्यवस्थापक माधव बोधवाणी, डॉ हितेंद्र देशमुख, डॉ प्रफुल दुग्गड, डॉ सचिन पारख, पंचायत समिती माजी सदस्य मनोहर देवरे यांचा प्रमुख उपस्थित कोव्हिडं सेंटरला देण्यात आलेत.

मागील वर्षी सुद्धापंतप्रधान कोविड सहाय्यतानिधी व मुख्यमंत्री कोविड सहाय्यता निधीला प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात आले होते व हस्ती बँकेचे संचालक-सदस्यांमार्फत तीन लाख रुपयांची देणगी मुख्यमंत्री कोविड सहाय्यता निधीला दिली होती.

Web Title: The Kovid Center was given an oxygen cylinder