निजामपूर येथे कोविड सेंटर सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST2021-04-08T04:36:06+5:302021-04-08T04:36:06+5:30

आमदार मंजुळा गावीत यांनी प्रयत्न करून येथेही पिंपळनेर प्रमाणेच कोविड सेंटर विकसित करावे, अशी अपेक्षा त्यांनी केली ...

Kovid Center should be started at Nizampur | निजामपूर येथे कोविड सेंटर सुरू करावे

निजामपूर येथे कोविड सेंटर सुरू करावे

आमदार मंजुळा गावीत यांनी प्रयत्न करून येथेही पिंपळनेर प्रमाणेच कोविड सेंटर विकसित करावे, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.

निजामपूर, जैताणे व परिसरातील गावांच्या कोरोना बाधित रुग्णांना साक्री, धुळे, नंदुरबार हलविण्याचे म्हटले की अत्यंत अवघड व जिकिरीचे झालेले आहे. तेथे बेड मिळत नाहीत. शिवाय रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. येथे सेंटर सुरू झाले तर त्यांचा त्रास वाचेल.

पिंपळनेर प्रमाणेच येथे एखाद्या शाळेत कोविड सेंटर सुरू करून परिसरातील बाधित रुग्णांना दिलासा द्यावा. जैताणे ग्रामीण रुग्णालयात पुरेसा कर्मचारीवर्ग नियुक्त करावा. व्हेंटिलेटरवरची व्यवस्था केली जावी.

आ. मंजुळा गावीत यांनी नुकतीच निजामपूर, जैताणे व परिसरात भेट देऊन कोविडच्या वाढत्या स्थितीचा आढावा घेतला.

Web Title: Kovid Center should be started at Nizampur