मालपूर येथे आज कानूबाई मातेची स्थापना होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 12:05 IST2019-08-04T12:04:41+5:302019-08-04T12:05:16+5:30

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे आज रविवार ४ आॅगस्ट रोजी दुपारुन सुमारे चार वाजता खान्देश कुलस्वामिनी श्री कानुबाई ...

Kanubai mothers will be established at Malpur today | मालपूर येथे आज कानूबाई मातेची स्थापना होणार 

मालपूर येथे आज कानूबाई मातेची स्थापना होणार 

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे आज रविवार ४ आॅगस्ट रोजी दुपारुन सुमारे चार वाजता खान्देश कुलस्वामिनी श्री कानुबाई माता व कन्हेर राजाची विधिवत स्थापना होणार आहे. 
यानंतर विधीवत पुजाअर्चा होवुन सायंकाळी गोरज मुहूर्तावर पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून आपापल्या परिवारातील सदस्य जोडघोडे समवेत गाटपोले बांधून रोट पुजण्यासाठी कानुबाई मातेजवळ येवून रोट पुजले जातील व रात्रभर गाणे, वाजंत्रीने रात्रभर जागरण करण्यात येईल. यासाठी जवळपास घोड्यावरुन देखील भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात.
या उत्सवामुळे दुरावलेले परिवारातील संबंध पुन्हा प्रस्थापित होत असल्यामुळे ग्रामीण भागात या उत्सवाला मोठे महत्त्व असून बाहेरगावाहून येथे मंडळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण गावात नवचैतन्याचे वातावरण दिसून येत आहे. यासाठी सर्व तयारी ग्रामपंचायत प्रशासनाने केलेली दिसून येत आहे. 

Web Title: Kanubai mothers will be established at Malpur today

टॅग्स :Dhuleधुळे