अवघ्या २४ तासात ३ मोबाईल चोर मालेगाव येथून ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 13:02 IST2020-07-07T13:00:49+5:302020-07-07T13:02:53+5:30

एक जण फरार : एलसीबी, शहर पोलिसांची संयुक्त कारवाई

In just 24 hours, 3 mobile thieves were arrested from Malegaon | अवघ्या २४ तासात ३ मोबाईल चोर मालेगाव येथून ताब्यात

अवघ्या २४ तासात ३ मोबाईल चोर मालेगाव येथून ताब्यात

धुळे : शहरातील बारा पत्थर चौकात असलेल्या कॉम्प्लेक्समधील मोबाईलचे दुकान चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी पहाटे घडली होती़ चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती़ त्याचे फुटेज आणि चोरटे नेमके कोणत्या दिशेला पळाले त्या दिशेचा अंदाज घेऊन पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली़ पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि धुळे शहर पोलीस यांचे पथक तयार करुन चोरट्यांच्या शोध कामी रवाना करण्यात आले़ मंगळवारी पहाटे तीन चोरट्यांना मालेगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे़ यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना तर धुळे शहर पोलिसांच्या पथकाने एकाला ताब्यात घेतले आहे़ त्यांना धुळ्यात आणले असून त्यांची चौकशी सुरु आहे़ या घटनेतील एक जण फरार असल्याने त्याचाही शोध घेतला जात असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले़

Web Title: In just 24 hours, 3 mobile thieves were arrested from Malegaon

टॅग्स :Dhuleधुळे