शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

जैताणे गाव ११तारखेपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:35 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय, जैताणेच्या संयुक्त यंत्रणेने ठेवलेल्या कोरोना तपासणी शिबिरात १५२ पैकी ५७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. ...

प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय, जैताणेच्या संयुक्त यंत्रणेने ठेवलेल्या कोरोना तपासणी शिबिरात १५२ पैकी ५७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आमदार मंजुळा गावित, तुळशीराम गावित, प्रांताधिकारी भीमराव दराडे, तहसीलदार विनायक थविल, गटविकास अधिकारी सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकार डॉक्टर तडवी, अजित बागुल आदींनी जैताणे येथे भेट देऊन तातडीने पावले उचलण्याच्या सूचना जैताणे वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक व सरपंच आदींना दिल्या होत्या. त्यानुसार ५ रोजी जैताणे ग्रामसेवक अनिल राठोड, सरपंच कविता मुजगे, पंचायत समिती सदस्य अशोक मुजगे, गटनेते बाजीराव पगारे, गणेश न्याहलदे, श्याम भलकारे, उपसरपंच कविता शेवाळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी तातडीने बैठक घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणीसंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत सर्वानुमते कडक पावले उचलण्यावर एकमत झाले. बैठकीत ठरल्याप्रमाणे गावातील वैद्यकीय आस्थापना सुरळीत सुरू राहतील. इतर अत्यावश्यक सेवा किराणा, कृषी सेवा केन्द्र, भाजीपाला आदी पूर्णपणे बंद राहणार आहेत. दूध विक्री घरपोच सकाळी ५ ते ७ व सायंकाळी ६ ते ८ या निर्धारित वेळेतच करता येईल. एस. टी. वाहतूक वगळता इतर वाहतुकीवरही निर्बंध असतील. आठवडे बाजार शासनादेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. दुकाने उघडल्यास ५ हजार रुपये दंड व सील करण्याची दंडात्मक कारवाई करण्यात येईल. (वैद्यकीय कारणाशिवाय) विनाकारण भटकंती करणाऱ्यास १ हजार प्रतिव्यक्ती दंड, विनामास्क आढळल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. अंत्यविधीस २० जणांची कमाल मर्यादा तसेच विवाह सोहळ्यास तहसीलदारांची परवानगी आवश्यक असून, ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. यासोबतच सर्व शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बैठकीनंतर झालेल्या निर्णयाची सूचना रिक्षा फिरवून ध्वनीपेक्षकाद्वारे ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत.