शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जैताणे, देवभाने शिवारात आग, गहू जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 12:32 IST

हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवर संकट

जैताणे/तिसगाव : जिल्ह्यातील जैताणे व देवभाने शेतशिवारात आग लागून गहु जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.जैताणेत ५० क्विंटल गहु खाकसाक्री तालुक्यातील जैताणे शिवारातील सुहासचंद्र विष्णुदास शाह यांच्या शेतात २२ रोजी रात्री अचानक आग लागून शेतात कापून ठेवलेला ५० क्विंटल गहू जाळून खाक झाला.शाह यांचे शेत संतोष बाविस्कर हे निम्मे हिश्श्याने करतात. त्यांच्या शेतातली तयार ५० क्विंटल गहु कापून गरी करुन रचून ठेवण्यात आला होता. २२ रोजी रात्री शेतात कुणी नसताना या गरीला आग लागली. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. २३ रोजी संतोष बाविस्कर यांनी निजामपूर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. निजामपूर पोलीस स्टेशनचे हे.कॉ.जयराज शिंदे व वामन चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. निजामपूर पोलिसात अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.देवभानेला २ एकरावरील गहु खाकधुळे तालुक्यातील देवभाने शिवारातील गट नंबर ५५३ मधील मुरलीधर भिवसन पाटील यांचे शेत तिसगाव ढंडाने येथील भगवान रावण पाटील यांनी निम्मे हिश्श्याने पेरणीसाठी घेतले आहे. त्यांनी ४ एकरवर गहू पेरणी केली होती. २३ रोजी लोंबकळणाºया विजेच्या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन दोन एकर क्षेत्रावरील गहु जळून खाक झाला.ही घटना शेजारील शेतात काम करणाºया वण्या भिल यांनी पाहून आरडाओरड केली. मात्र, कोरडा गहू असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आणि गहु जळून खाक झाला. आग विझवेपर्यंत सुमारे दोन ते अडीच एकर क्षेत्रावरील गहू जळून खाक झाला आहे.याबाबत शेतकरी भगवान पाटील यांनी सांगितले की, शेतामध्ये गहू पिक घेण्यासाठी २२ ते २५ हजार रुपये खर्च झाला आहे. रात्र-दिवस पाणी भरण्यासाठी अतोनात मेहनत घेतली. मात्र, लोंबकळणाºया विजेच्या तारांमुळे हात तोंडाशी आलेला घास असा हिरावला जाईल, अशी धास्ती होती. यामुळे वारंवार सांगूनही विजेच्या लोंबकळणाºया तारा ओढण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ऐन दुष्काळामध्ये मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे