इंदोरीकर महाराज खटल्याच्या निकालाविरुध्द उच्च न्यायालयात दाद मागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:32 IST2021-04-03T04:32:02+5:302021-04-03T04:32:02+5:30

धुळे : लिंग निवड प्रतिबंध कायदा अंतर्गत निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदोरीकर यांच्यावर दाखल खटल्यात अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने ...

Indorikar Maharaj will appeal against the verdict in the High Court | इंदोरीकर महाराज खटल्याच्या निकालाविरुध्द उच्च न्यायालयात दाद मागणार

इंदोरीकर महाराज खटल्याच्या निकालाविरुध्द उच्च न्यायालयात दाद मागणार

धुळे : लिंग निवड प्रतिबंध कायदा अंतर्गत निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदोरीकर यांच्यावर दाखल खटल्यात अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेला निकाल हा न्याय नाही. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य कार्यवाह ॲड. रंजना गवांदे यांनी स्पष्ट केले आहे.

अंनिसने प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदोरीकर यांनी त्यांच्या कीर्तनात सम तिथीला स्त्री समागम केला तर मुलगा होतो, विषम तिथीला स्त्री समागम केला तर मुलगी होते आणि अशुभ तिथीला समागम केला तर संतती रांगडी, बेवडी होते, असे वक्तव्य केले होते.

इंदोरीकर यांच्याबाबत दिलेल्या निकालाच्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असे अंनिसने प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट केले आहे.

Web Title: Indorikar Maharaj will appeal against the verdict in the High Court