शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर आरोग्य विभाग : कुसुंबा, आर्वी, मुकटी, सोनगिरला सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST

धुळे : येथील जिल्हा रुग्णालय आणि हिरे वैद्यकीय महाविद्यालयावरील ताण कमी करण्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णांकरिता स्वतंत्र कोविड केअर सेंटर ...

धुळे : येथील जिल्हा रुग्णालय आणि हिरे वैद्यकीय महाविद्यालयावरील ताण कमी करण्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णांकरिता स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ग्रामीण भागासाठी कुसुंबा, आर्वी आणि बाफना काॅलेजमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. मुकटी आणि सोनगिर येथेही सेंटर सुरु होणार आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाने तीन कोविड केअर सेंटर सुरु केली आहेत. बाफना कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा हिरे रुग्णालयात दाखल केले जात होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वाढल्याने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी गावाजवळ उपचाराची सोय करण्यात आली. त्यानुसार आर्वी आणि कुसुंबा येथे प्रत्येकी ३० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु झाले आहे. तसेच धुळे शहरात बाफना काॅलेजमध्येदेखील ग्रामीण रुग्णांसाठी सेंटर कार्यान्वित होणार आहे. या सेंटरची क्षमता ५०पेक्षा अधिक बेडची असणार आहे.

नव्याने सुरु झालेल्या आणि लवकरच सुरु होणाऱ्या या सेंटरमध्ये लक्षणे नसलेल्या आणि साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार होणार आहेत. लामकानी येथेही कोविड सेंटर प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे सेंटर सुरु झाल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील सरकारी दवाखान्यांवरील ताण कमी होणार आहे. रुग्णांचीही गावाजवळच सोय होईल. शहरातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमधील बेडसाठी वेटिंग सुरु आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठीही नंबर लागले आहेत.