कोरोनानंतरचे साइड इफेक्टस् वाढले, औषधी काळजीपूर्वक घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:38 AM2021-05-11T04:38:22+5:302021-05-11T04:38:22+5:30

कोरोनाचा वाढता कहर हा सर्वांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. बाधित रुग्णांना दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार केले ...

Increased side effects after corona, take the drug carefully | कोरोनानंतरचे साइड इफेक्टस् वाढले, औषधी काळजीपूर्वक घ्या

कोरोनानंतरचे साइड इफेक्टस् वाढले, औषधी काळजीपूर्वक घ्या

Next

कोरोनाचा वाढता कहर हा सर्वांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. बाधित रुग्णांना दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार केले जातात. त्यांनी कोणती औषधी केव्हा घ्यायची याची त्यांना वेळोवेळी माहिती दिली जात असतानाच नर्स अथवा ब्रदर्स यांच्या माध्यमातून रुग्णांपर्यंत औषधी दिली जातात. त्यातील काही औषधी ही संबंधित रुग्णांना सूट होईलच याची काही शाश्वती कोणालाही देता येऊ शकत नाही. अशावेळी डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घेणे हे रुग्ण आणि रुग्णांच्या भवितव्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. याकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असेल तर त्याचा त्रास हा रुग्णांना होणे क्रमप्राप्त ठरू शकते.

रेमडेसिविरचे साइड इफेक्टस्

कोरोनाबाधित रुग्णांवर त्यांच्या उपचारावेळी रेमडेसिविर या इंजेक्शनचा वापर केला जातो. हे इंजेक्शन प्रत्येक रुग्णाच्या शरीराला सूट होईलच असे सांगता येणार नाही. परिणामी त्याचे होणारे साइड इफेक्टस्‌देखील वेगवेगळे असू शकतात. यात कोणाच्या डोळ्याला त्रास होऊ शकतो, तर कोणाच्या किडनीला बाधा पोहोचू शकते. सर्वांनाच सरकट त्रास होईल असे काही सांगता येत नाही़

काय होतात परिणाम

कोरोनाबाधितांवर उपचार केले जात असताना त्यांना कोणत्या प्रकारच्या औषधींची मात्रा देणे हे तपासत असताना मात्र जी काही प्राथमिक अशी औषधी असतील ती सुरू करणे गरजेचे आहे. रुग्णांवर औषधींची मात्रा योग्य प्रमाणावर होत असेल तर कोणत्याही प्रकारचा परिणाम हा रुग्णांवर होणारा नसतो़ औषधींचा परिणाम हा त्या रुग्णांच्या शरीराच्या प्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे़

स्टेराइडचे साइड इफेक्टस्‌

स्टेराइडचा परिणाम हा आपल्यातील प्रतिकारशक्तीवर थेट होत असतो. त्यामुळे औषधींची मात्रा ही वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्याच सल्लाने घेणे कधीही फायदेशीर ठरणारे आहे. कोरोनासंदर्भातील औषधी ही परस्पर घेणे संयुक्तिक नाही. आपल्यातील प्रतिकारशक्तीवर सर्व काही अवलंबून आहे.

काय काळजी घ्यायची?

कोरोनाबाधितांवर उपचार झाल्यानंतर त्यांनी नियमितपणे आपल्याला असणाऱ्या आजारानुसार डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आपले नाक स्वच्छ ठेवावे. काही असेल तरी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घ्यावी.

- डॉ. निर्मलकुमार रवंदळे

Web Title: Increased side effects after corona, take the drug carefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.