मनपाच्या ‘जेट पावर प्रेशर’मशीन उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:33 IST2019-12-27T22:31:55+5:302019-12-27T22:33:18+5:30

मनपाच्या ‘जेट पावर प्रेशर’मशीन उदघाटन

Inauguration of Jet Power Pressure Machine of the Corporation | मनपाच्या ‘जेट पावर प्रेशर’मशीन उदघाटन

Dhule

धुळे : शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचा प्रश्न सोडविण्यासाठी मनपाकडून वॉशिंग मशीन खरेदी करण्यात आले आहे़ या मशीनचा उद्घाटन शुक्रवारी महापौर चंद्रकांत सोनार, भाजपा महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते महानगरपालिका प्रांगणात झाले़
शहराच्या विविध भागात महापालिकेकडून नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे़ या शौचालयांची हवी तशी स्वच्छता होत नसल्याने सदस्यांसह नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात होत्या़ शौचालयातील स्वच्छतेचा प्रश्न सोडविण्यासाठी व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मनपाने नाशिक, पुणे, अहमदनगर महापालिकेच्या धर्तीवर जेट पावर प्रेशर मशीन खरेदी केले आहे़ सदरील मशीन छोट्या वाहनावर बसविण्यात येणार आहे़ त्यात सुमारे दीडशे ते दोनशे फुट लांब पाईपद्वारे शौचालयाच्या ठिकाणी प्रेशरद्वारे पाणी व केमिकल्स एसिडचा वापर करून शौचालयांची स्वच्छता केली जाणार आहे़ हे मशीन सेवा फाउंडेशन संस्थेतर्फे उपलब्ध करून दिले आहे़ त्यामुळे शौचालयांच्या स्वच्छतेची समस्या सोडविण्यात मदत होईल़ या वाहनाच्या शुभारंभप्रसंगी स्थायी समिती सभापती युवराज पाटील, उपायुक्त गणेश गिरी, नगरसेवक राजेश पवार, सुनील बैसाने, भिकन वराडे, दगडू बागुल, प्रवीण अग्रवाल, मुख्य स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव, सेवा फाउंडेशन संस्थेचे दीपक ठाकूर, प्रदीप चव्हाण तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Web Title: Inauguration of Jet Power Pressure Machine of the Corporation

टॅग्स :Dhuleधुळे